युवा मोर्चाच्या संकल्प तिरंगा ध्वज रॅलीस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST2021-08-17T04:38:05+5:302021-08-17T04:38:05+5:30
रॅलीची सुरुवात प्रतिष्ठान भवन येथून झाली. तिरंगा ध्वज व पुष्पचक्र घेऊन शहरातील संत गाडगेबाबा चौकातील हुतात्मा स्मारक येथे वीर ...

युवा मोर्चाच्या संकल्प तिरंगा ध्वज रॅलीस प्रतिसाद
रॅलीची सुरुवात प्रतिष्ठान भवन येथून झाली. तिरंगा ध्वज व पुष्पचक्र घेऊन शहरातील संत गाडगेबाबा चौकातील हुतात्मा स्मारक येथे वीर हुतात्म्यांना आदरांजली वाहत पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजमुद्रेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर तिरंगा ध्वज रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, सीताराम वनवे, राजकुमार पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, अनंत देशमुख, संजय लोखंडे, विनायक कुलकर्णी, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, पांडुरंग पवार, अभय इंगळे, युवराज नळे, दाजीप्पा पवार, चंद्रजित जाधव, शिवाजी पंडगुडवाले, झुंबर घोडके, नाना धत्तुरे, नामदेव नायकल, आशिष नायकल, विनोद निंबाळकर, अजय यादव, ओम नाईकवाडी, अमोलराजे निंबाळकर, प्रीतम मुंडे, सुजीत साळुंके, सूरज शेरकर, प्रसाद मुंडे, संदीप इंगळे, शरीफ शेख, सलमान शेख, महेश बागल, सदानंद आकोसकर, अजित खापरे, अमोल पेठे, संतोष क्षीरसागर, सुधीर नायकल, सुनील पंडगुडवाले, मनोजसिंह ठाकूर, कुलदीप भोसले, गिरीष पानसरे, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपा कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा
उस्मानाबाद : येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात आ. राणा जगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेश देशमुख यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. कार्यक्रमास प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, राजकुमार पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, अनंत देशमुख, संजय लोखंडे, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, अभय इंगळे, युवराज नळे, दाजीप्पा पवार, चंद्रजित जाधव, शिवाजी पंडगुडवाले, सुजित साळुंके, नामदेव नायकल आदी उपस्थित होते.
नूतन विद्यामंदिर
उस्मानाबाद : शहरातील नूतन प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. विठ्ठलराव पडवळ, मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, संजय जाधव, रामराजे पाटील, सहदेव मुळे, रमेश वागदकर, संतोष माळी, प्रवीण गोरे, राम मुंडे, बंडू मदने, दत्ता माळी, दीपाली राऊत, उषा मिसाळ, शीतल देशमुख, शीतल उटगे, तृप्ती तिकोणे, मनिषा इंगळे, अश्विनी बुकन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.