तरुण शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST2021-09-14T04:38:39+5:302021-09-14T04:38:39+5:30
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, घाटनांदूर येथील तरुण शेतकरी आकाश काकासाहेब बेरगळ यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ईट शाखेतून ...

तरुण शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, घाटनांदूर येथील तरुण शेतकरी आकाश काकासाहेब बेरगळ यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ईट शाखेतून पीककर्ज घेतले हाेते. तसेच काही खासगी लाेकांचेही देणे हाेते. साेयाबीनवर सर्वांचे देणे देण्याचे त्यांनी ठरविले हाेते. परंतु, मागील दहा ते बारा दिवसांत झालेल्या धाे..धाे...पावसामुळे हाेत्याचे नव्हते झाले. याच नैराश्यातून त्यांनी १३ सप्टेंबर राेजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घाटनांदूर शिवारातील बेरगळ वस्तीवरील पत्र्याच्या शेडच्या आडूला गळफास लावून आत्महत्या केली, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पाेलिसांत अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाे.हे.काॅ. अशाेक करवर, अच्युत कुटे हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे.