सकाळी उठून पहावं लागतं आज काेणाचा नंबर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:26+5:302021-09-27T04:35:26+5:30

उस्मानाबाद : सध्याच्या विराेधी पक्षाने एखाद्याचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे दरराेज सकाळी उठून आज काेणाचा ...

You have to get up in the morning and see whose number today? | सकाळी उठून पहावं लागतं आज काेणाचा नंबर?

सकाळी उठून पहावं लागतं आज काेणाचा नंबर?

उस्मानाबाद : सध्याच्या विराेधी पक्षाने एखाद्याचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे दरराेज सकाळी उठून आज काेणाचा नंबर आहे हे पहावे लागते, अशी खंत माजी वनमंत्री संजय राठाेड यांनी रविवारी व्यक्त केली.

उस्मानाबाद दाैऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या राजकीय संक्रमणाचा काळ आहे. या संक्रमणाचा मी पहिला बळी ठरलाे. यापूर्वीही राज्यात विराेधी पक्ष हाेते. मात्र, तेव्हाच्या विराेधकांकडून राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य या दाेन बाबींमध्ये गल्लत केली जात नव्हती. परंतु, सध्याच्या विराेधी पक्षाची भूमिका एखाद्याचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलल्यासारखी आहे. अशा स्वरूपाचे चित्र राज्यात पहिल्यांदाच पहावयास मिळत आहे. एखाद्याविषयी राजकीय सुडाची भावना इतका खालचा स्तर गाठेल, असे कधी वाटले नव्हते. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीवर आराेप हाेताे. मात्र, चाैकशीतून सत्य बाहेर येण्याअगाेदरच आराेपी ठरविले जाते. हा अधिकार विराेधकांना दिला काेणी, असा सवालही माजी वनमंत्री राठाेड यांनी उपस्थित केला.

चाैकट...

राज्य मागास आयाेगाला अधिकार द्या...

ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी आवश्य असलेला इम्पिरिकल डेटा केंद्राकडे आहे. केंद्र सरकार हा डेटा देणार नसल्याचे सर्वाेच्च न्यायालयात सांगते. त्यांना डेटा द्यायचाच नसेल तर किमान असा इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे अधिकार तरी राज्य मागास आयाेगाला दिले पाहिजेत, अशी मागणी माजी वनमंत्री राठाेड यांनी केली.

Web Title: You have to get up in the morning and see whose number today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.