पुलासाठी बाेरी नदीपात्रात येडाेळाकरांचे जलसमाधी आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST2021-09-14T04:38:31+5:302021-09-14T04:38:31+5:30

नळदुर्ग- गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे येडाेळा गावाला जाेडणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. हा पूल उभारण्यात यावा, या मागणीसाठी सातत्याने ...

Yedellakar's water mausoleum in the Bari river basin for the bridge | पुलासाठी बाेरी नदीपात्रात येडाेळाकरांचे जलसमाधी आंदाेलन

पुलासाठी बाेरी नदीपात्रात येडाेळाकरांचे जलसमाधी आंदाेलन

नळदुर्ग- गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे येडाेळा गावाला जाेडणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. हा पूल उभारण्यात यावा, या मागणीसाठी सातत्याने ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत; परंतु आजवर ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. त्यामुळे रिपाइं (ए.) व ग्रामस्थांच्यावतीने बाेरी नदी पात्रात साेमवारी जलसमाधी आंदाेलन केले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले.

तुळजापूर तालुक्यातील येडाेळा गावाला जाेडणाऱ्या रस्त्यावरील पूल वर्षभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेला हाेता. त्यामुळे गावचा संपर्कही तुटला हाेता. हा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पूल उभारणीच्या अनुषंगाने आदेश जारी केले हाेते; मात्र संबंधित कंत्राटदाराने केराची टाेपली दाखवित अद्याप पूल बांधकाम केलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांसाेबतच विद्यार्थ्यांचेही प्रचंड हाल हाेत आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रिपाइं (ए.) व ग्रामस्थांच्यावतीने साेमवारी बाेरी नदी पात्रात जलसमाधी आंदाेलन केले. नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे व पाेलिसांनी तातडीने आंदाेलनस्थळी दाखल हाेत ग्रामस्थांशी चर्चा केली. लवकरच पूल उभारण्यात येईल, अशी ग्वाही दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. आंदाेलनात रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, इंद्रजित जाधव, शाहूराज पाटील, प्रभाकर पाटील, चेतन जाधव, नवनाथ आबा जाधव, बलभीम जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुधीरसिंग परिहार, अजित जाधव, लिंबराज जाधव, राजेंद्र जाधव, दिगंबर पाटील, दत्ता शेगर, पंडित भोसले, बाशीदभाई कुरेशी, ज्येष्ठ कार्यकर्ते राम लोंढे, सुरेश लोंढे, देवानंद लोंढे, मारुती लोंढे, भानुदास लोंढे, सोपान गायकवाड, प्रवीण कांबळे, लक्ष्मण लोंढे, अनिल लोंढे, आनंद चव्हाण, धोंडिबा रठोड, परमेश्वर राठोड, सुरेश पवार, भूषण पवार, बाबू राठोड, ग्रामसेविका एस.एस. गोरे, उपसरपंच लक्ष्मीताई जाधव आदी उपस्थित हाेते.

Web Title: Yedellakar's water mausoleum in the Bari river basin for the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.