शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाचा एक्स-रे; भिंतीच्या आतील तड्यांचाही शोध घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 17:35 IST

तुळजाभवानी मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबुतीकरणाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले आहे.

धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या मंदिराला पुरातन रूप प्राप्त करून देण्यासाठी सध्या पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिरात कामे सुरू आहेत. यावेळी अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेले असल्याचे आढळून आले आहे. या अनुषंगाने अगदी भिंतीच्या आतीलही तड्यांचा शोध घेण्यासाठी एक्स-रे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी पुरातत्त्वच्या सहायक संचालक जया वाहने यांनी दिली.

तुळजाभवानी मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबुतीकरणाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले आहे. त्यात मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी बीम, स्तंभ व कर्णशिळांमध्ये तडे आढळून आले आहेत. या अनुषंगाने बोरस्कोपी चाचणीतून मंदिरात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या बांधकाम साहित्याची तपासणी करण्यात येणार आहे. क्ष-किरण तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भगृह आणि शिखराच्या आतील भागातील लपलेले तडे आणि नुकसान समोर येणार असल्याचे जया वाहने म्हणाल्या. तसेच ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार तंत्रज्ञानाद्वारे मंदिराचा पाया आणि भूगर्भातील स्थिरतेचीही तपासणी होणार आहे. या तिन्ही चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर मजबुतीकरणासंदर्भात त्यावेळी निर्णय घेतला जाणार आहे.

भूकंपानंतर झाले होते बळकटीकरणमंदिराच्या शिखराचे बळकटीकरण १९९३ साली झालेल्या भूकंपानंतर करण्यात आले होते. मात्र, त्या दुरुस्तीमुळे शिखरावर अतिरिक्त भार येऊन मूळ दगडी रचनेला तडे गेल्याचा निष्कर्ष पुरातत्त्व विभागाने केलेल्या पाहणीतून काढण्यात आला आहे.

सुरक्षिततेसाठी निर्णायक पावलेश्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत. मंदिराच्या मूळ स्थापत्यशैलीचे जतन करताना भाविकांची सुरक्षा आणि ऐतिहासिक वारशाचे रक्षण या दोन्ही बाबींचा विचार शासनाने केला आहे. या अनुषंगानेच विविध तंत्रज्ञानांची मदत घेत काही चाचण्या लवकरच केल्या जातील.- जया वाहने, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणdharashivधाराशिव