लोहारा येथे घरकुलासाठी महिलांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 20:26 IST2018-10-01T20:25:41+5:302018-10-01T20:26:10+5:30
रमाई घरकूल मिळावे यासाठी लोहारा तालुक्यातील नागूर येथील रमाई महिला मंडळाच्या सदस्यांनी सोमवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

लोहारा येथे घरकुलासाठी महिलांचे उपोषण
लोहारा ( उस्मानाबाद) : रमाई घरकूल मिळावे यासाठी लोहारा तालुक्यातील नागूर येथील रमाई महिला मंडळाच्या सदस्यांनी सोमवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात आंदोलनकर्त्या महिलांच्या वतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, रमाई अवास योजनेचे घरकूल मिळावे यासाठी ग्रामपंचायतकडे मागणी करण्यात आल्यानंतर अर्ज भरुन घेण्यात आले. परंतु, अद्यापही घरकूल मिळालेले नाही. त्यामुळे घरकूल मिळेपर्यत हे उपोषण उपोषण सुरू राहणार आहे. निवेदनावर रमाई महिला मंडळाच्या केशरबाई शिंदे, कडाबाई कसबे, संगिता गायकवाड, बारकाबाई देडे, पूजा देडे, मदन मस्के, लक्ष्मी सोनवणे, अनिता गायकवाड, विमल सोनवणे, पांडूरंग गायकवाड, समाधान सोनवणे, बालाजी कांबळे, फुलचंद सोनवणे आदींच्या सह्या आहेत.