महिलेचा विनयभंग, दोघांविरुध्द गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:25 IST2020-12-26T04:25:59+5:302020-12-26T04:25:59+5:30

कोरेगाववाडी शिवारातून विद्युत पाणबुडी पंपाची चोरी उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी शिवारात प्रविण माने यांचे शेत आहे. शेत विहिरीतील ...

Woman molestation, crime recorded against both | महिलेचा विनयभंग, दोघांविरुध्द गुन्हा नोंद

महिलेचा विनयभंग, दोघांविरुध्द गुन्हा नोंद

कोरेगाववाडी शिवारातून विद्युत पाणबुडी पंपाची चोरी

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी शिवारात प्रविण माने यांचे शेत आहे. शेत विहिरीतील ५ अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पाणबुडी पंप व दोन स्टार्टर अज्ञात चोरट्याने २३ व २४ डिसेंबर दरम्यानच्या रात्री चोरुन नेली. विद्युत पंप व स्टार्टर चोरी गेल्याचे समजताच माने यांनी उमरगा ठाण्यात २५ डिसेंबर रोजी फिर्याद दिली. यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद झाला.

दुचाकीची कारला धडक दुचाकीस्वार जखमी

उस्मानाबाद : आलुर येथील इरेश महादेवय्या मठ यांच्या कारला अज्ञात दुचाकीस्वाराने क्र. एमएच. २४ एसी ७४२७ दुचाकी निष्काळजीपणे चालवून कारला धडक दिली. या अपघातात कारचे आर्थिक नुकसान झाले असून, दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना २४ डिसेंबर रोजी नारंगवाडी शिवारातील नाईचाकूर फाटा येथे घडली. या प्रकरणी इरेश मठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा नोंद झाला.

जुन्या भांडणावरुन दोघास मारहाण

उस्मानाबाद : तालुक्यातील वाघोली येथील मनोजकुमार राऊत हे त्यांच्या भाऊजईसह २४ डिसेंबर रोजी हिंगळजवाडी येथील स्वत:च्या शेतात होते. यावेळी हिंगळजवाडी येथील बालाजी देविदास जाधव व वैशाला शरद अपसरे या दोघांनी तेथे येऊन जुन्या भांडणाचा वाद उकरुन काढत दोघास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. यावरुन मनोजकुमार राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त दोघांविरुध्द गुन्हा नोंद झाला.

Web Title: Woman molestation, crime recorded against both