शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

तुळजापुरातील इच्छापूर्ती गणेश मंदिरातील दानपेटी फोडण्याची चोरांची ‘इच्छा’ अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 6:42 PM

तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात पहाटे चोरीची घटना घडली

तुळजापूर ( उस्मानाबाद) : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात आज पहाटे चोरीची घटना घडली. यात चोरट्यांना चांदीचे ताट लंपास करण्यात यश मिळाले तरी दोनपेटी फोडण्याची त्यांची ‘इच्छा’ मात्र फळली नाही़

तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील उस्मानाबाद मार्गावर इच्छापूर्ती गणपतीचे मंदिर आहे़ सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ सुरुवातीला मंदिरात ठेवलेली दानपेटी बाहेर आणून फोडण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यात चोरट्यांना यश मिळाले नाही़ त्यामुळे  दैनंदिन पुजेसाठी मूर्तीसमोर ठेवलेले ४५०० रूपये किंमतीचे चांदीचे ताट घेऊन चोरट्यांनी पोबारा केला़ सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.

या प्रकरणी कल्याण तुकाराम तोडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, रविवारी रात्री श्रींच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या़ उश्रिापर्यंत चालेल्या मिरवणुकांनंतर शहर सामसूम होताच चोरट्यांनी गणपतीच्याच मंदिरात हात साफ केला़ दरम्यान, गुन्हा दाखल करुन पोलिसांनी विविध मार्गांनी तपास सुरू केला आहे़ परिसरातील नागरिकांकडे चौकशी करतानाच आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्याचे कामही पोलिसांनी सुरु केले आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबादPoliceपोलिस