विजेवरील बससाठी करावी लागणार प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST2021-09-02T05:10:22+5:302021-09-02T05:10:22+5:30
उस्मानाबाद : डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. इलेक्ट्रिकल बस खरेदीसाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. ...

विजेवरील बससाठी करावी लागणार प्रतीक्षा
उस्मानाबाद : डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. इलेक्ट्रिकल बस खरेदीसाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात या बस धावणार आहेत. प्राथमिक स्तरावर काही जिल्हे निवडण्यात आले असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना विजेवर बसप्रवासासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. उस्मानाबाद एसटी महामंडळाकडून माहिती मिळाली आहे.
तर..या मार्गावर धावतील बस
अद्याप इलेक्ट्रिकल बस प्रस्तावित नसल्याने त्या कोणत्या मार्गावर धावणार याचे नियोजन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, सोलापूर येथे चार्जिंग स्टेशन झाल्यानंतर या बस उस्मानाबाद-सोलापूर मार्गावर धावतील, अशी माहिती आहे.
बस सुरू होण्यास अवधी लागणार
राज्यातील काही जिल्ह्यात संभाव्य बसची माहिती पाठविण्यात आली आहे; मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप हा प्रस्तावित नाही.
त्यामुळे बसची संख्याही निश्चित नाही. या प्रक्रियेस साधारण एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी-अधिक काळही लागू शकणार आहे.
चार्जिंग सेंटरची स्थळे अनिश्चित
इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या बससाठी चार्जिंग सेंटरची निर्मिती करावी लागणार आहेत. सध्या ही तर योजना प्राथमिक स्तरावरच आहे. त्यामुळे नेमके चार्जिंग स्टेशन कुठे राहणार याबाबत निश्चित नाही. परंतु पुणे, सोलापूर येथे चार्जिंग सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे या मार्गावर बस धावू शकतील.
खर्चात होणार बचत
विजेवर चालणाऱ्या एसटी बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर खर्चात बचत होणार आहे. अडचणी कमी होतील. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होऊ शकतील.बसच्या चार्जिंगसाठी महत्त्वाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. त्यामुळे डिझेलवरील खर्च टाळून महामंडळाला मोठी आर्थिक बचत होऊ शकणार आहे. त्यामुळे तोट्यात असलेल्या महामंडळास फायदा होणार आहे.
कोट..
इलेक्ट्रिकल बससाठी चार्जिंग सेंटर उभे राहणार आहेत. ज्या ठिकाणी सेंटर आहे. त्या ठिकाणी चार्जिंग बस देण्यात येणार आहेत. चार्जिंग झाल्यानंतर ३०० किमीपर्यंत बस धावणार आहे. पुणे, सोलापूर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे राहात आहे. उस्मानाबाद विभागास स्वतंत्र बस मिळतील का सोलापूरच्या बस धावतील अशा याबाबत माहिती नाही.
अमृता ताह्मणकर, विभाग नियंत्रक, उस्मानाबाद