शाळा सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:40 IST2021-09-10T04:40:07+5:302021-09-10T04:40:07+5:30

कोरोना विषाणूचा शैक्षणिक क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे. तरीही शासन यावर ठोस पावले उचलताना दिसत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ...

A warning of agitation to start school | शाळा सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

शाळा सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

कोरोना विषाणूचा शैक्षणिक क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे. तरीही शासन यावर ठोस पावले उचलताना दिसत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे; परंतु ग्रामीण भागात यातही अनेक अडचणी येत आहेत. मुलांना लिहिता, वाचता येते का, याचे कोणालाही काही घेणे देणे नाही. ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या मुलांना अजून धड वाचताही येत नाही. यावर शिक्षण विभागाने काहीच उपाय योजना केल्या नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोरोनाचे नियम व अटीच्या अधिन राहून पहिली ते बारावीची शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. यावर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, तालुकाध्यक्ष समाधान खुळे, कार्याध्यक्ष अमोल गोडगे, उपाध्यक्ष सुहास ठोंगे, आजिनाथ शेळके, बालाजी महाराज बोराडे, नानासाहेब मांडवे, बाळासाहेब देशमुख, संतोष भांडे, माजी सरपंच मनोज काळे, प्रीतम जाधव, दत्ता मेहेर, सुरज केदारे यांच्या सह्या आहेत.

Web Title: A warning of agitation to start school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.