तीन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST2021-01-18T04:29:46+5:302021-01-18T04:29:46+5:30

परंडा : जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामात काम करणाऱ्या हमाल कामगारांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक ...

Waiting for salary for three months! | तीन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा !

तीन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा !

परंडा : जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामात काम करणाऱ्या हमाल कामगारांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत असून, त्यांना तातडीने वेतन द्यावे, अशी मागणी जिल्हा हमाल मापाडी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील उस्मानाबाद, बेंबळी, ढोकी, तेर, तुळजापूर, नळदुर्ग, लोहारा, उमरगा, मुरूम, येरमाळा, परंडा, अनाळा, भूम, वाशी आदी ठिकाणी शासकीय धान्य गोदामे आहेत. या ठिकाणी शेकडो हमाल, कामगार काम करतात. या हमालांना त्यांच्या कामाचे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांचे वेतन मिळणे बाकी आहे. वेतन न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. तसेच त्यांच्या वेतनावरील तीस टक्के लेव्ही रक्कमही मिळालेली नाही.

त्यामुळे हे तीन महिन्याचे प्रलंबित वेतन व तीस टक्के लेव्हीची रक्कम तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून लातूर व उस्मानाबाद जिल्हा माथाडी व असंघटीत कामगार मंडळाकडे जमा करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ यादव यांनी केली आहे.

Web Title: Waiting for salary for three months!