एका मतदारास दाेघांना द्यावे लागेल मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:42+5:302021-09-26T04:35:42+5:30
शासनाने सुरूवातीला एक वाॅर्ड एक नगरसेवक असे सूत्र ठरविले हाेते. त्यामुळे मतदारांना केवळ एका उमेदवारासाठीच मतदान करावे लागत हाेते. ...

एका मतदारास दाेघांना द्यावे लागेल मत
शासनाने सुरूवातीला एक वाॅर्ड एक नगरसेवक असे सूत्र ठरविले हाेते. त्यामुळे मतदारांना केवळ एका उमेदवारासाठीच मतदान करावे लागत हाेते. मात्र, हा निर्णय मागे घेत ‘एक प्रभाग, दाेन नगरसेवक’ असे सूत्र जाहीर केले. त्यामुळे आता एका मतदारास दाेन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे दाेन्ही उमेदवार ताकदीचे असतील तरच प्रभाग कुठल्या तरी एका पक्षाच्या ताब्यात येऊ शकताे.
शहराच्या विकासाला बसेल खिळ?
निवडणुकीच्या काळात अनेक फॅक्टर महत्वपूर्ण ठरतात. ‘एक वाॅर्ड एक नगरसेवक’ असे सूत्र असल्यास प्रत्येकजण स्वत:साठी मतदान मागताे. अधिकाधिक मतदान मिळविण्यासाठी सर्व फंडे अवलंबिले जातात. परंतु, प्रभाग म्हटले की, जाे ताकदवर उमेदवार असेल, त्यास साेबतच्या उमेदवारालाही सांभाळावे लागते. दाेघांसाठी मतदान मागावे लागते. अनेकवेळा एखादा उमेदवार मतदारांच्या पसंतीचा नसेल, तर त्यांचा फटका साेबतच्या दुस-या चांगल्या उमेदवारास बसताे. परिणामी वाॅर्ड एक असला तरी निवडून आलेले उमेदवार दाेन वेगवेगळ्या पक्षांचे असतात. याचा थेट परिणाम प्रभागातील विकास कामांवर हाेताे.
सर्वच पदाधिकारी म्हणतात, आमचाच फायदा...
एक प्रभाग, दाेन नगरसेवक हे समिकरण आमच्या पक्षासाठी फायद्याचेच आहे. एखादा उमेदवार संपर्काच्या दृष्टीकाेनातून कमी पडला तरी दुसरा उमेदवाराची त्यास मदत हाेते. परिणामी दाेन्ही उमेदवार निवडून येतात. त्यामुळे सरकारचा हा निर्णय आमच्यासाठी फायद्याचा ठरेल.
-साेमनाथ गुरव, गटेनेता, शिवसेना.
काॅंग्रेस पक्षाकडून मागील काही महिन्यांपासून शहरात इच्छूक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारचा ‘एक प्रभाग, दाेन नगरसेवक’ हा निर्णय आमच्यासाठी जमेचाच ठरेल. यात तिळमात्र शंका नाही.-अग्निवेश शिंदे, शहर प्रमुख, काॅंंग्रेस.
२०१६ च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रभागांची मतदारसंख्याही वाढेल. शहरापुरते बाेलायचे झाले तर भाजपासाठी पाेषख वातावरण आहे. त्यामुळे ‘एक वाॅर्ड एक उमेदवार असले काय अन् एक प्रभाग दाेन उमेदवार असे का? ’ त्याचा आमच्या तयारीवर काहीही परिणाम हाेणार नाही.-अभय इंगळे, भाजपा.
पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आमची चाैफेर तयारी सुरू आहे. ‘एक प्रभाग, दाेन नगरसेवक’ या नवीन सूत्राचा राष्ट्रवादीला निश्चित चांगला फायदा हाेतील. हे सूत्र समाेर ठेवूनच आम्ही उमेदवार चाचपणी करीत आहाेत.
-गणेश खाेचरे, गटनेता, राष्ट्रवादी काॅंंग्रेस.