शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Vinayak Mete: महिना 30 रुपये भाडं, हातानेच करायचे स्वयंपाक; मित्राने सांगितलं मेटेचं शालेय जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 15:34 IST

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघर्षशील नेतृत्व विनायकराव मेटे यांचे मुंबई पुणे महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले

बालाजी अडसूळ

उस्मानाबद/कळंब - तीस रूपये महिन्याकाठी भाडे मोजाव्या लागणार्‍या पत्र्याच्या खोलीत, हातांने स्वयंपाक करत दिवंगत विनायक मेटे यांनी आपल्या गावातील चार संवगड्यासह कळंब शहरात शिक्षणासाठी दोन वर्षाचा मुक्काम ठोकला होता. यासह दुसऱ्या अनेक प्रसंगात कळंबकरांना सहवास लाभलेल्या मांजराकाठच्या या संघर्षशील नेतृत्वाच्या अपघाती मृत्यूच्या वार्तेनं वेगळीच हुरहूर लागल्याचे दिसून आले. 

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघर्षशील नेतृत्व विनायकराव मेटे यांचे मुंबई पुणे महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले. विविध संघटना, आरक्षण चळवळ, मराठवाडा लोकविकास फोरम यासह विविध चळवळीत, राजकारण व समाजकारणातील व्यक्तिंसाठी 'मेटे साहेब' गेल्याची ही बातमी सुन्न करणारी होती. याचप्रमाणे कळंबकरांसाठी पण ती तितकीच धक्कादायक अन् 'ब्लॅक संडे' ठरली. कारण, विनायक मेटे यांचे राजेगाव ता. केज हे गाव जिल्हा सरहद्दीवर कळंबपासून २२ तर इटकूरपासून १२ तर बहुल्यापासून केवळ दोन किमी. बहुला अन् राजेगावच्या मधूनच मांजरा नदी प्रवाही होत्या. त्यामुळेच राजेगाव अन् विशेषतः विनायकराव मेटे यांचा कळंबशी निकटचा संबंध आलेला. 

विद्याभवन शाळेत गिरवले धडे... 

बीड जिल्हा हद्दीवरील केज तालुक्यातील पिंपरी, नाहोली, राजेगाव, बोरगाव ही गावे शिक्षण व बाजारपेठेसाठी कळंबलाच कनेक्ट होती. यामुळेच सातवीपर्यंत राजेगावच्या जिप शाळेत शिकलेल्या विनायक मेटें यांनी आठवीत कळंब येथील विद्याभवन शाळेत प्रवेश घेतला. येथे दोन वर्ष काढत पुन्हा नाहोलीत दहावी काढली. साधारणतः १९८४ च्या दरम्यान ते कळंब येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होते. 

भाड्याची खोली, हाताने स्वयंपाक... 

दिवंगत विनायक मेटे कळंब येथील पत्की वाडा व मानकर वाडा येथे किरायाच्या खोलीत सवंगडी शिवाजी मेटे, नारायण जाधव, फुलचंद मेटे, रामहरी मेटे यांच्यासह वास्तव्य करत होते. यासाठी पत्र्याच्या खोलीत तीस रूपये मासीक भाडे मोजत हाताने स्वयंपाक करावा लागत होता असे वर्गमित्र तथा 'रूम पार्टनर' असलेल्या शिवाजी मेटे यांनी सांगितले. 

सात्र्याच्या पात्रात वाहताना वाचवले... 

शिवाजी मेटे सांगतात विनायक धाडसी, साहसी होते. अंगी नेतृत्वगुण, वक्तृत्व होते. आम्ही शनिवारी अर्धी शाळा बुडवून सात्रा, बोरगाव, नाहोली अशी पायपीट करत राजेगाव गाठायचो. सोमवारी परत फिरायचो. एकदा मांजराच्या पाण्यात आम्ही वाट काढत असताना वहिवाटलो. उंच्यापुऱ्या विनायक बप्पांनी यात स्वतःला तर सावरले अन् मलाही बाहेर काढले. हा प्रसंग सांगताना शिवाजी मेटे यांना अश्रू आवरता आले नाहीत. 

मांजरा काठचा, आमचा माणुस गेला... विनायक मेटे यांनी सातत्याने संघर्ष केला. मांजरा तीरावरील हे नेतृत्व याच संघर्षातून राज्यात ठसा उमटून होते. समाज व मराठवाडा यांच्या हितासाठी कायम झटणारा मांजराकाठचा आमचा वाटणारा माणूस गेल्याचे मोठे दुख आहे. अॅड अनंत चोंदे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष ▪️

आमच्याकडे या, संघटनेला बळ द्या... 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड दिलीपसिंह देशमुख व विनायक मेटे मराठा महासंघात काम करत होते. पुढं मेटेनी शिवसंग्राम काढला. यावेळी अॅड देशमूख यांना तुमची आमच्या चळवळीला गरज आहे. संघटनेत काम करा असे सुचवले होते. असे अॅड दिलीपसिंह देशमूख यांनी सांगितले. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेBeedबीडOsmanabadउस्मानाबादAccidentअपघात