आलियाबाद पुलाचे ग्रामस्थांकडून पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:28+5:302021-09-18T04:35:28+5:30

हैदराबाद संस्थान खालसा करण्यासाठी निघालेल्या मिलिटरी फौजेला मराठवाड्यात रोखून धरण्यासाठी रझाकारांनी येथील सोलापूर-हैदराबाद रोडवरील आलियाबाद पूल उडवून देऊन मिलिटरी ...

Villagers worship Aliabad bridge | आलियाबाद पुलाचे ग्रामस्थांकडून पूजन

आलियाबाद पुलाचे ग्रामस्थांकडून पूजन

हैदराबाद संस्थान खालसा करण्यासाठी निघालेल्या मिलिटरी फौजेला मराठवाड्यात रोखून धरण्यासाठी रझाकारांनी येथील सोलापूर-हैदराबाद रोडवरील आलियाबाद पूल उडवून देऊन मिलिटरी मराठवाड्यातच रोखून धरायचे होते. मात्र, तो प्रयत्न तत्कालीन स्वातंत्र्यप्रेमींनी हाणून पाडल्याने मिलिटरी हैदराबाद संस्थानात घुसून संस्थान खालसा करून घेतले म्हणून येथील आलियाबाद पुलास अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठवाडा मुक्ती दिनाची आठवण म्हणून दरवर्षी या पुलाची पूजा केली जाते. पूजनाचा साेहळा नगरसेवक विनायक अहंकारी व नितीन कासार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, नगरसेवक विनायक अहंकारी, नितीन कासार बसवराज धरणे, महालिंग स्वामी, शिवसेनेचे कार्यकर्ते बंडू कसेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, सन्नी भुमकर, सुहास येडगे, विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, उत्तम बणजगोळे, अमर भाळे, महेंद्र डुकरे, अय्युब शेख, अनिल जाधव आदींची उपस्थित होती.

Web Title: Villagers worship Aliabad bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.