Video: शेतकऱ्याने अडविले, विचारले गद्दारी का केली? बच्चू कडू काहीही न बोलता निघून गेले
By चेतनकुमार धनुरे | Updated: February 28, 2023 18:08 IST2023-02-28T18:06:33+5:302023-02-28T18:08:40+5:30
शेतकऱ्याने बच्चू कडू यांच्यावर प्रश्नांचा भडिमारच सुरु केला; मात्र काहीही उत्तर न देता हसत हसत कडूंनी काढता पाय घेतला

Video: शेतकऱ्याने अडविले, विचारले गद्दारी का केली? बच्चू कडू काहीही न बोलता निघून गेले
धाराशिव : न्यायालयीन काम आटोपून बाहेर पडताना माजी मंत्री बच्चू कडू यांना मंगळवारी धाराशिवमध्ये एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. एका ८० वर्षीय शेतकऱ्याने कडूंना अडवून तुमच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या, गद्दारांसोबत का गेलात, असा सवाल करीत काही वेळ वाहनही अडवून ठेवले होते. पदाधिकार्यांनी त्यांना बाजूला केल्यानंतरच कडूंची सुटका झाली व ते बाहेर रवाना झाले.
धाराशिवच्या जिल्हा व सत्र न्यायालयात कामकाजासाठी माजी मंत्री बच्चू कडू हे सोमवारीच दाखल झाले आहेत. कालच त्यांना न्यायालयाने एका आंदोलनावेळी पोलिसांचा अवमान केल्याप्रकरणी दंडाची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारीही कडू हे याच कामानिमित्त धाराशिवमध्ये होते. जिल्हा न्यायालयातील काम आटोपून ते बाहेर पडत असताना उपळे दुमाला येथील अर्जून भगवान घोगरे या शेतकर्याने अचानक त्यांना रोखले.
धाराशिव : शेतकऱ्याने बच्चू कडूंना अडविले, विचारले गद्दारी का केली? बच्चू कडू काहीही न बोलता निघून गेले...#bacchukadupic.twitter.com/nInpxWwi0t
— Lokmat (@lokmat) February 28, 2023
या आजोबांचे म्हणणे समजून घेण्यासाठी कडू थांबले असता त्यांनी प्रश्नांचा भडिमारच सुरु केला. शांतपणे कडू यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हसतच त्यांनी घोगरे यांच्यापासून सुटका करुन घेत आपल्या वाहनात बसले. यानंतरही घोगरे यांनी वाहनापुढे थांबून काही क्षण ते रोखून धरले होते. पदाधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला सारल्यानंतर कडू हे न्यायालयाबाहेर पडू शकले.