जेसीबीतून गुलालाची उधळण करीत विजयी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:56+5:302021-02-11T04:33:56+5:30
सिंदगाव : मेलगिरी, करंडे यांची निवड जेवळी : तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विवेकानंद मेलगिरी, तर उपसरपंचपदी जयमाला करंडे ...

जेसीबीतून गुलालाची उधळण करीत विजयी मिरवणूक
सिंदगाव : मेलगिरी, करंडे यांची निवड
जेवळी : तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विवेकानंद मेलगिरी, तर उपसरपंचपदी जयमाला करंडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर जेसीबीमधून गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊपैकी श्री दत्त ग्रामविकास पॅनलने सात जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी एस.एन. पालेकर यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंचांची निवड झाली. यावेळी सरपंचपदासाठी श्री दत्त ग्रामविकास पॅनलकडून विवेकानंद मेलगिरी, तर सिंदगाव ग्रामविकास पॅनलकडून गंगाधर पेठसांगवे यांनी, तर उपसरपंचपदासाठी जयमाला करंडे व ललिता पवार यांनी अर्ज दाखल केला होता. सरपंचपदाचे उमेदवार विवेकानंद मेलगिरी व उपसरपंचपदाचे जयमाला करंडे यांना प्रत्येकी सात, तर त्यांच्या विरोधी उमेदवारांना दोन मते पडली. दोन्ही उमेदवारांनी सात विरुद्ध दोन मतानी विजय मिळवला.
यानंतर नूतन सरपंच, उपसरपंच, पॅनलप्रमुखांचा सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली. यात बार्शीहून आलेले घोडे सर्वांचे लक्ष केंद्रित करीत होते. मिरवणुकीत विजयी उमेदवारासह पॅनलप्रमुख चेअरमन सिद्रामप्पा परशेट्टी, जयहिंद मेलगिरी, ज्ञानेश्वर रेड्डी, श्रीपती ताडकर, बलभीम पांढरे, लक्ष्मण पाटील, विठ्ठल ताडकर व ग्रामस्थ सहभागी झाले होते.