राज्य उपाध्यक्षपदी डॉ. संदीप तांबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:10+5:302021-02-06T04:59:10+5:30

कळंब : महाॲग्री एफपीओ फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी येडाई प्रोड्युसर कंपनीचे डॉ. संदीप तांबरे यांची निवड करण्यात आली आहे. ...

As the Vice President of the State, Dr. Sandeep Tambare | राज्य उपाध्यक्षपदी डॉ. संदीप तांबरे

राज्य उपाध्यक्षपदी डॉ. संदीप तांबरे

कळंब : महाॲग्री एफपीओ फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी येडाई प्रोड्युसर कंपनीचे डॉ. संदीप तांबरे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांना व्यवसायाचे विविध परवाने काढून देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभे करणे, शेतमालाच्या किंमतवाढीसाठी मूल्यवर्धन साखळी तयार करणे, त्याचबरोबर शेतीमध्ये लागणाऱ्या विविध निविष्ठा सभासद शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे याविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम या फेडरेशनमार्फत केले जाणार आहे. फेडरेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जिल्हानिहाय शेतीपूरक व्यवसायाचे व प्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर स्थापन केले जाणार असून, शेतमालाच्या किमतीत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच गावखेड्यामध्ये तयार होणारा शेतीमाल हा परदेशात पोहोचवण्याचे काम होणार असल्याचे डॉ. तांबरे यांनी सांगितले.

Web Title: As the Vice President of the State, Dr. Sandeep Tambare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.