सातवीच्या गुणपत्रिकपुढे पडताळणीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST2021-09-05T04:36:28+5:302021-09-05T04:36:28+5:30
चौकट... सातवी गुणपत्रिकेची पडताळणी मदतनीस पदासाठी सातवी तर सेविकांसाठी दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता होती. यापैकी दहावीचा निकाल बोर्डाच्या ...

सातवीच्या गुणपत्रिकपुढे पडताळणीची परीक्षा
चौकट...
सातवी गुणपत्रिकेची पडताळणी
मदतनीस पदासाठी सातवी तर सेविकांसाठी दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता होती. यापैकी दहावीचा निकाल बोर्डाच्या ‘कस्टडी’त असल्याने शंकाकुशंकेचा प्रश्न नव्हता. मात्र, सातवीची परीक्षा अन् निकाल शाळेच्या अखत्यारितील विषय असल्याने खबरदारी घेत, सीडीपीओ ऑफिसने गुणानुक्रमे प्रथमस्थानी असलेल्या ३३ मदतनिसांच्या सातवी गुणपत्रिकेची पडताळणी सुरू केली आहे. यानुसार, संबंधित मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. यामुळे आत्ता निवड यादीतील ‘टॉपर’ उमेदवारांनी सादर केलेल्या सातवीच्या गुणपत्रिकेला पडताळणीच्या परीक्षेत ‘उत्तीर्ण’ व्हावे लागणार आहे
बीईओंचा अहवाल, पण मागविला...
दोन चाचण्या व दोन सत्र परीक्षा होत असलेल्या सातवीसाठी आरटीई लागू झाल्यानंतर ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ लागू झाले. यातून ‘आकारीक आणि संकलीत’ मूल्यांकन केेले जाऊ लागले. या स्थितीत आता सीडीपीओंनी उमेदवारांनी सादर केलेली गुणपत्रिका आपणच निर्गमित केली आहे का? यात तत्कालीन निर्देशानुसार गुणांकन केले आहे का? याविषयी मुख्याध्यापकांना विचारणा तर केली आहे, शिवाय यासंबंधी गटशिक्षण अधिकाऱ्याकडून गुणदान पद्धत, गुणपत्रिका नमुना यासंबंधी स्वयंस्पष्ट अहवाल मागविला असल्याचे सांगण्यात येते.