‘वाशी ग्रामीण रुग्णालयास उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:35+5:302021-09-24T04:38:35+5:30
वाशी हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातून औरंगाबाद-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर नेहमीच छोटे-मोठे अपघात होतात. अशा ...

‘वाशी ग्रामीण रुग्णालयास उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा’
वाशी हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातून औरंगाबाद-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर नेहमीच छोटे-मोठे अपघात होतात. अशा घटनांतील जखमींना या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. मात्र या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. परिणामी, जुजबी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती १९८२ साली तेव्हाची लाेकसंख्या विचारात घेऊन केली. त्या वेळची लोकसंख्या व आजच्या लोकसंख्येत दुपटीने फरक पडला आहे. वाढलेली लाेकसंख्या लक्षात घेता, या ठिकाणी ट्राॅमा केअर सेंटर उभारण्याची गरजही माजी आमदार राहुल माेटे यांनी मांडली आहे. हे निवेदन माजी आमदार राहुल मोटे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे़ याप्रसंगी माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँगेसचे शहराध्यक्ष विकास पवार, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. सूर्यकांत सांडसे आदींची उपस्थिती हाेती.