वसंतराव काळे म्हणजे नेता घडविणारी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST2021-02-05T08:17:16+5:302021-02-05T08:17:16+5:30
उस्मानाबाद : वसंतराव काळे हे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानू कार्य करणारे नेते होते. मराठवाडाभर फिरून त्यांनी अनेक ताकदवान कार्यकर्ते निर्माण ...

वसंतराव काळे म्हणजे नेता घडविणारी कार्यशाळा
उस्मानाबाद : वसंतराव काळे हे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानू कार्य करणारे नेते होते. मराठवाडाभर फिरून त्यांनी अनेक ताकदवान कार्यकर्ते निर्माण केले. यामुळे ते नेता घडविण्याची कार्यशाळा होती, असे म्हटले जाते, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
तालुक्यातील पळसप येथे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ व शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘मी अनुभवलेले वसंतराव’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुंबी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी आ. वैजिनाथ शिंदे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेविका प्रा. सुशीला मोराळे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सूर्यकांत जगदाळे, औरंगाबादचे एस. पी. जवळकर, आ. विक्रम काळे, अनिल काळे, शुभांगी काळे, सिनेट सदस्य डॉ. नरेंद्र काळे, प्रा. अंकुश नाडे, गंगाधर आरडले आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. मोराळे यांनी वसंतराव काळे ह वास्तववादी विचार मांडून सामाजिक बांधिलकी जपणारे नेते होते, असे सांगितले. जवळकर म्हणाले, वसंतरावांनी मराठवाड्याच्या मातीत माणसे पेरून अनेक नेते तयार केले. एकूणच सर्वांना सोबत घेऊन जाणारा कप्तान म्हणून त्यांनी कार्य केले आहे. यावेळी डॉ. सूर्यकांत जगदाळे, वैजिनाथ शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आ. विक्रम काळे तर सूत्रसंचालन गिरी यांनी केले. यावेळी मराठवाड्यातील साहित्यिक, रसिक, शिक्षक, प्राध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट....
४८ जणांची नेत्र तपासणी
१ फेब्रुवारी रोजी यानिमित्त नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यात ४८ जणांची तपासणी करण्यात आली. तसेच यातील २२ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी उदगीर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी दिली. तसेच सर्वरोग निदान शिबिरात ७५ जणांची तपासणी करण्यात आली. सायंकाळी हभप ज्ञानोबा माऊली डिघोळकर यांचे कीर्तन झाले.