दीपक जवळगे यांच्या वाढदिनी विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST2021-02-05T08:17:31+5:302021-02-05T08:17:31+5:30
धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य ॲड. दीपक जवळगे यांचा वाढदिवस ...

दीपक जवळगे यांच्या वाढदिनी विविध उपक्रम
धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य ॲड. दीपक जवळगे यांचा वाढदिवस वयोवृद्ध नागरिकांना ब्लँकेट वाटप, आरोग्य शिबिर व जिल्हा परिषद शाळेत सॅनिटायझर व मास्क वाटपाने साजरा करण्यात आला. यानिमित्त डीजे चषक व्हॉलिबॉल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन पोनि. धरमसिंग चव्हाण यांच्या हस्ते झाले. सोमवारी तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष उमेश बनकर, प्रहार अपंग क्रांती लोहारा तालुका उपाध्यक्ष अभिजित साळुंके, उद्योजक भागवत बनकर, नूतन सरपंच प्रवीण थोरात, नूतन सदस्य सचिन तिगाडे, परमेश्वर साळुंके, संदीपन बनकर, राम पाटील, सुधाकर साळुंके, श्रीकांत जाधव, गणेश जाधव, महेश साळुंके, मार्तंड शिंदे, महेश साळुंके, संभाजी वडजे, अरुण साळुंके, रुपेश पाटील, बाळू बाबर, सतीश बुरुटूकणे, राहुल बाबर आदी उपस्थित होते. (वाणिज्य वार्ता)