आता पोलीस, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना मिळेल लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:30+5:302021-02-06T04:59:30+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील तब्बल ८ हजार व्यक्तींना पहिल्या टप्प्यात कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात असून, त्यासाठी लागणारे ...

Vaccines will now be available to police and revenue officials | आता पोलीस, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना मिळेल लस

आता पोलीस, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना मिळेल लस

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील तब्बल ८ हजार व्यक्तींना पहिल्या टप्प्यात कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात असून, त्यासाठी लागणारे डोस आरोग्य यंत्रणेस दोन टप्प्यांत प्राप्त झाले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता पोलीस विभाग व महसूल कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता कोविन ॲपवर नोंदणी सुरू असून, प्रत्यक्ष सोमवारपासून लसीकरणास सुरुवात होणार आहे.

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात शासकीय व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील ९ हजार २०० कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली. अद्याप जिल्ह्यातील पहिल्या फळीतील ४ हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच गुरुवारपासून पालिका कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यानंतर आता पोलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. कोविन ॲपवर ९३३ होमगार्ड, कारागृह अधिकारी, कर्मचारी ४९ तसेच १ हजार ८७८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. तर, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती मागविली आहे. महसूलच्या ७१५ कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारपासून लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली.

१९ हजार ५० डोस प्राप्त

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १० हजार ५० डोस आरोग्य विभागास प्राप्त झाले. दुसऱ्या टप्प्यात ९ हजार डोस असे एकूण १९ हजार ५० डोस आरोग्य यंत्रणेस प्राप्त झाले आहे.

कोट..

आरोग्य, महसूल, पोलीस, पालिका अशा विविध विभागांतील १४ हजार १५३ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविन ॲपवर नावनोंदणी केली आहे. १९ हजार ५० डोस प्राप्त आहेत. दुसरा डोस २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे. दुसऱ्या डोससाठी लसीचा पुरवठा होणार आहे.

डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा लसीकरण अधिकारी

कोविन ॲपवर नोंदणी झालेली नोंदणी

आरोग्य कर्मचारी

९२००

पोलीस अधिकारी, कर्मचारी

१८७८

महसूल विभाग

७१५

होमगार्ड

९३३

कारागृह अधिकारी, कर्मचारी

४९

पालिका कर्मचारी

१३७६

Web Title: Vaccines will now be available to police and revenue officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.