शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

उस्मानाबादेत आजारी असल्याचा बनाव करणारे १५ पोलीस कर्मचारी एकाच दिवशी निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 18:21 IST

एकाच दिवशी एक दोन नव्हे १५ कर्मचारी निलंबीत झाल्याने कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची कारवाईआजारी असल्याचा बनाव आला अंगलट

उस्मानाबाद : आजारी नसतानाही आजारी असल्याचा बनाव करणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी आज निलंबीत केले. एकाच दिवशी एक दोन नव्हे १५ कर्मचारी निलंबीत झाल्याने कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़

उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाचा पदभार हाती घेतल्यापासून पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी अवैध दारू, जुगारांविरूध्द धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे़ कर्तव्यकसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे़ पोलीस अधीक्षकांच्या धडक कारवाई आणि निलंबन सत्रामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांसह कामचुकार अधिकारी, कर्मचारी हैराण झाले आहेत़ आजारी रजेवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली होती़ यात १५ कर्मचारी आजारी नसताना आजारी असल्याचा बनाव करून आजारी रजा घेत कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचे दिसून आले़ त्यामुळे पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी आज कार्यालयीन आदेश काढून एकाच दिवशी १५ कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे़

यात पोलीस मुख्यालयासह सात पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़ निलंबन कालावधीत काहींना पोलीस मुख्यालयाशी तर काहींना इतर पोलीस ठाण्याशी संलग्न करण्यात आले आहे़ बेशिस्त, निष्काळजीपणा, गैरवर्तणूक, शिस्तभंगाबाबतच्या प्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षकांनी सुरू केली आहे़ दरम्यान, एकाच दिवशी १५ पोलीस कर्मचारी निलंबीत होण्याची जिल्हा पोलीस दलातील ही पहिलीच घटना आहे़ पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे़

टॅग्स :PoliceपोलिसOsmanabadउस्मानाबादUsmanabad S Pपोलीस अधीक्षक, उस्मानाबाद