अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने केले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:16 IST2021-02-05T08:16:05+5:302021-02-05T08:16:05+5:30

जिल्ह्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी १ फेब्रुवारी रोजी मैत्रिणीकडे जाते असे कुटुंबीयांना सांगून घरातून बाहेर गेली. ती ...

Unknown abduction of a minor girl | अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने केले अपहरण

अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने केले अपहरण

जिल्ह्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी १ फेब्रुवारी रोजी मैत्रिणीकडे जाते असे कुटुंबीयांना सांगून घरातून बाहेर गेली. ती पुन्हा घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती सापडत नसल्याने मुलीच्या पित्याने पोलीस ठाण्यात मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची फिर्याद दिली. यावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

जुगार अड्ड्यावर छापा, एकाविरुद्ध गुन्हा

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील रांजणी येथील एका जुगार अड्ड्यावर शिराढोण पोलीस ठाण्याच्या पथकाने २ फेब्रुवारी रोजी छापा मारला. यात रांजणी येथील सलीम मोहयोद्दीन सय्यद यांच्याजवळ कल्याण मटका जुगार साहित्य व ७८० रुपये आढळून आले. पथकाने जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

खडकी येथे दारुअड्ड्यावर धाड

उस्मानाबाद : खडकी येथे अवैध दारु विक्री होत असल्याची माहिती तामलवाडी पोलिसांस खबऱ्यामार्फत प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे तामलवाडी पोलिसांनी २ फेब्रुवारी खडकी येथील एका दारु अड्ड्यावर धाड टाकली. यात खडक येथील सुरेश शिंदे याच्याजवळ देशी-विदेशी दारुच्या ७ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी मद्य जप्त करुन संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

२४२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाया

उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४२ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाया मंगळवारी जिल्ह्यातील विविध मार्गावर १८ पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आल्या. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून ५८ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आली.

Web Title: Unknown abduction of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.