उमरगा उपजिल्हा रुग्णालयास अद्ययावत ॲम्बुलन्स देणार : आ. सतीश चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:02+5:302021-05-07T04:34:02+5:30

आ. चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयातील अडचणींचा आढावा घेतला असता रुग्णालयाच्या वतीने वाढीव ऑक्सिजन सिलिंडरची मागणी करण्यात आली. याबाबत आ. ...

Umarga sub-district hospital to get updated ambulance: Satish Chavan | उमरगा उपजिल्हा रुग्णालयास अद्ययावत ॲम्बुलन्स देणार : आ. सतीश चव्हाण

उमरगा उपजिल्हा रुग्णालयास अद्ययावत ॲम्बुलन्स देणार : आ. सतीश चव्हाण

आ. चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयातील अडचणींचा आढावा घेतला असता रुग्णालयाच्या वतीने वाढीव ऑक्सिजन सिलिंडरची मागणी करण्यात आली. याबाबत आ. चव्हाण यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वाढीव ऑक्सिजन सिलिंडरसंदर्भात चर्चा केली. उस्मानाबाद येथे जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून बीड व जालना येथील जिल्हाधिकाऱ्यांना २०० वाढीव ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्याची मागणी केली. तसेच रुग्णालयाच्या वतीने अद्ययावत ऑक्सिजन रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली. याबाबत त्यांनी एक अद्ययावत रुग्णवाहिका लवकरच उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. याशिवाय लिक्विड ऑक्सिजन स्टोरेजसाठी प्रस्ताव पाठवून द्या, अशी सूचना आ. चव्हाण यांनी संबंधितांना केली. यावेळी रूग्णालयातील कामकाजासाठी कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने अडचणी येत असल्याने वाढीव कर्मचाऱ्यांची मागणी नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर यांनी केली. यानंतर ईदगाह कोविड सेंटर येथे आ. चव्हाण यांनी भेट देऊन तेथील रुग्णांची चौकशी करून कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर, आरोग्य कर्मचारी, नितीन बागवे, प्रा. सतीश इंगळे, जगदीश सुरवसे, खाजा मुजावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Umarga sub-district hospital to get updated ambulance: Satish Chavan