ज्याेतिबाचीवाडीतून दुचाकी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST2021-01-18T04:29:50+5:302021-01-18T04:29:50+5:30

धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका महिलेवर खेडेगावातील एका तरुणाने मुलास व पतीस जिवे मारण्याची धमकी ...

The two-wheeler was stolen from Jyatibachiwadi | ज्याेतिबाचीवाडीतून दुचाकी पळविली

ज्याेतिबाचीवाडीतून दुचाकी पळविली

धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका महिलेवर खेडेगावातील एका तरुणाने मुलास व पतीस जिवे मारण्याची धमकी देऊन मागील दोन वर्षापासून उस्मानाबाद व सोलापूर येथील लॉजमध्ये लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी एकाविरुध्द १६ जानेवारी रोजी गुन्हा नोंद झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेडेगावातील २६ वर्षीय तरुणाने जिल्ह्यातील एका ३४ वर्षीय महिलेस पतीस व मुलास जिवे मारण्याची धमकी देऊन जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२१ या कालावधीत वेळोवेळी उस्मानाबाद व सोलापूर येथील लॉजमध्ये लैंगिक अत्याचार केले, अशी फिर्याद पिडीत महिलेने १६ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात दिली. यावरुन संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद झाला.

कारच्या धडकेत एकजण जखमी

उस्मानाबाद : भूम तालुक्यातील गिरवली येथील बजरंग तांबे हे ११ जानेवारी रोजी दहीफळ फाटा येथे थांबले होते. यावेळी अज्ञात कार चालकाने क्र.एमएच. २५ ए २२३५ ही निष्काळजीपणे चालवून बजरंग तांबे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बजरंग तांबे यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले, असा जबाब तांबे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिला. यावरुन अज्ञात कारचालकाविरुध्द एकाविरुध्द गुन्हा नोंद झाला.

३०६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. शनिवारी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने ३०६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून ६७ हजार ६०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

Web Title: The two-wheeler was stolen from Jyatibachiwadi