पीकअपच्या धडकेत दुचाकीवरील दाेेघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:52+5:302020-12-29T04:29:52+5:30
उस्मानाबाद - भरधाव पीकअपने दुचाकीला जाेराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा हात तर दुसऱ्याचा पाय माेडला. या प्रकरणी ...

पीकअपच्या धडकेत दुचाकीवरील दाेेघे जखमी
उस्मानाबाद - भरधाव पीकअपने दुचाकीला जाेराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा हात तर दुसऱ्याचा पाय माेडला. या प्रकरणी पीकअप चालकाविरूद्ध तुळजापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील पीकअप वाहन (क्र. एमएच.१३-एएन.१७२१) निष्काळजीपणे व चुकीच्या दिशेने चालवून दुचाकीला (क्र. एमएच. २५-एक्स.२११४) समाेरून जाेराची धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक भैरू केदारी साळवे (रा. अमृतवाडी, ता. तुळजापूर) यांच्या उजव्या पायाचे तर पाठीमागे बसलेले सुभाष कदम यांच्या हाताचे हाड माेडले. अपघाती घटनेनंतर पीकअपचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी भैरू साळवे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून भादंसंचे कलम २७९, ३३७, ३३८ आणि माेटार वाहन कायद्याचे कलम १८४, १३४ (अ, ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास तुळजापूर पाेलीस करीत आहेत.