भूम शहरातून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:34 IST2021-05-09T04:34:25+5:302021-05-09T04:34:25+5:30

देशी दारूच्या ५५ बाटल्या जप्त उस्मानाबाद : शहरातील बाेंबले हनुमान मंदिराजवळ वास्तव्यास असलेल्या निलावती काळे यांच्याकडून अैवधरीत्या विक्रीसाठी ठेवलेल्या ...

Two-wheeler lampas from Bhum town | भूम शहरातून दुचाकी लंपास

भूम शहरातून दुचाकी लंपास

देशी दारूच्या ५५ बाटल्या जप्त

उस्मानाबाद : शहरातील बाेंबले हनुमान मंदिराजवळ वास्तव्यास असलेल्या निलावती काळे यांच्याकडून अैवधरीत्या विक्रीसाठी ठेवलेल्या देशी दारूच्या ५५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

६६ जणांविरुद्ध कारवाई

उस्मानाबाद : दाेन व्यक्तींत सुरक्षित अंतर न ठेवल्याप्रकरणी ६६ जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे १३ हजार २०० रूपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राघुचीवाडी येथे छापा

उस्मानाबाद : तालुक्यातील विजय श्रीमंत ढाेबळे यांनी आपल्या ताब्यात देशी-विदेशी दारूच्या २६ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अवैध विक्रीसाठी दारूच्या बाटल्या जवळ बागल्याप्रकरणी ढाेबळे यांच्याविरुद्ध उस्मानाबाद शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Two-wheeler lampas from Bhum town