दोन आरटीओ एजेंट अँटिकरप्शनच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST2021-09-09T04:40:02+5:302021-09-09T04:40:02+5:30
तक्रारदार यांच्या भावाच्या नावे असलेल्या चारचाकी मालवाहू गाडीची पुनर्नोंदणी करून वाहनाच्या आरटीओ तपासणीमध्ये मदत करण्यासाठी आरोपी खासगी आरटीओ ...

दोन आरटीओ एजेंट अँटिकरप्शनच्या जाळ्यात
तक्रारदार यांच्या भावाच्या नावे असलेल्या चारचाकी मालवाहू गाडीची पुनर्नोंदणी करून वाहनाच्या आरटीओ तपासणीमध्ये मदत करण्यासाठी आरोपी खासगी आरटीओ एजेंट तानाजी भोगील याने आरटीओ कार्यालयासमोर ४ हजार ५०० रुपयांची लाचेची केली होती. ३ हजार रुपये ८ सप्टेंबर रोजी ऑनलाइन सर्व्हिस सेंटर चालक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्फतीने पंचांसमक्ष स्वीकारले. तर यापूर्वीच त्याने १ हजार ५०० रुपये स्वीकारले असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कार्यवाही उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांनी केली. त्यांना पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य यांनी मदत केली.