सोशल मीडियाच्या माध्यमातून दोनशे जणांना मिळाला प्लाझमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:45+5:302021-05-19T04:33:45+5:30

अंकुश अंधारे (पॉझिटिव्ह स्टोरी) माणकेश्वर : सोशल मीडियाकडे एक मनोरंजनाचे माध्यम म्हणून पहिले जाते. मात्र, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील तरुणांनी ...

Two hundred people got plasma through social media | सोशल मीडियाच्या माध्यमातून दोनशे जणांना मिळाला प्लाझमा

सोशल मीडियाच्या माध्यमातून दोनशे जणांना मिळाला प्लाझमा

अंकुश अंधारे

(पॉझिटिव्ह स्टोरी)

माणकेश्वर : सोशल मीडियाकडे एक मनोरंजनाचे माध्यम म्हणून पहिले जाते. मात्र, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील तरुणांनी याचा चांगल्या कामासाठी उपयोग केला आहे. ‘आम्ही कोविड योध्दे’ या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत १५० हून अधिक रुग्णांना प्लाझ्मा, तर शंभरावर रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिविर इंजेक्शन यासह इतर उपचारासाठी मदत मिळवून दिली आहे.

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन अभियांत्रिकीचे विद्यार्थी प्रतीक बाबासाहेब अंधारे, प्रतीक धनंजय कोकाटे, अविनाश प्रल्हादराव रावते या तरुणांनी ‘आम्ही कोविड योध्दे’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला आहे. सुरुवातीला या ग्रुपमध्ये तीनच सदस्य होते. त्यांनी या ग्रुपमध्ये सामाजिक कार्यात तत्पर असणारे समाजसेवक, डॉक्टर्स, नर्स, मेडिकल दुकानदार यांना सामील करून घेत गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला. सध्या या ग्रुपमध्ये २५६ सदस्य आहेत. यामध्ये प्रामुख्याने मनोज अंधारे, अंकुश अंधारे, बालाजी पाटील, प्रवीण पवार आदींचा समावेश आहे.

ग्रुपमधील या सदस्यांनी आतापर्यंत २०० हून अधिक जणांना प्लाझ्मा मिळवून दिला आहे.

व्हॉट्सॲप, फेसबुक माध्यमांचा वापर करत अनेक रुग्णांना बेड, हॉस्पिटल आदी बाबी मिळवून देण्यासाठी मदत केली. फक्त पोस्ट टाकली की अनेक कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांकडूनदेखील मदतीसाठी हात पुढे येतात, अशी माहिती माणकेश्वर येथील प्रतीक अंधारे यांनी दिली.

कोट.........

कोरोना या जागतिक महामारीच्या कठीण वेळी आपण काहीतरी मदत केली पाहिजे, या भावनेतून व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. सुरुवातीला आम्ही तिघेच याचे सदस्य होतो. आता उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील २५६ तरुणांना या माध्यमातून एकत्र आणले आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांना मदत करण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली.

- प्रतीक कोकाटे, लातूर

Web Title: Two hundred people got plasma through social media