‘टू-जीबी’ ठरतेय डाेकेदुखी; माेबाइल हाेताहेत हँग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:24+5:302021-01-08T05:43:24+5:30
बालकांचे लसीकरण, गृहभेटी, बालकांच्या दैनंदिन नाेंदी यांसारखी कामे पूर्वी अंगणवाडी सेविकांना रजिस्टरवर घ्याव्या लागत हाेत्या. हे काम वेळखाऊ हाेते. ...

‘टू-जीबी’ ठरतेय डाेकेदुखी; माेबाइल हाेताहेत हँग
बालकांचे लसीकरण, गृहभेटी, बालकांच्या दैनंदिन नाेंदी यांसारखी कामे पूर्वी अंगणवाडी सेविकांना रजिस्टरवर घ्याव्या लागत हाेत्या. हे काम वेळखाऊ हाेते. ही बाब समाेर आल्यानंतर शासनाकडून प्रत्येक अंगणवाडी सेविकांना माेबाइल पुरविण्यात आले. त्यामुळे कामकाजात गतिमानता आणि अचूकपणा येईल, असे अपेक्षित हाेते; परंतु ही अपेक्षा १०० टक्के प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. कारण या माेबाइलची रॅम केवळ दाेन जीबी आहे. एवढेच नाही तर खेडाेपाडी रेंजही मळत नाही, त्यामुळे सरकारकडून पुरविण्यात आलेेले हे माेबाइल सातत्याने हँग हाेण्याचे प्रकार घडत आहेत. काही सेविकांचे माेबाइल तर सातत्याने बंद हाेतात. त्यामुळे कामकाजात नेहमी अडथळा येताे. परिणामी, अहवाल वेळेत पाठविणे कठीण हाेत असल्याचे काही सेविकांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
चाैकट...
माेबाइलवरून काेणती सरकारी कामे करावी लागतात?
१. बालकांचे लसीकरण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या लसीकरणाच्या नाेंदी घेण्याचे काम माेबाइलद्वारे सुरू आहे.
२. घराेघरी भेटी देऊन बालकांच्या नाेंदीही माेबाइलच्या माध्यमातून घेतल्या जातात.
३. स्तनदा माता, गराेदर माता व मुलींच्या आराेग्याच्या अनुषंगानेही माेबाइलद्वारे नाेंदी घेण्यात येतात.
४. अंगणवाडीतील बालकांना पाेषण आहार, औषधांच्या वाटपाच्या नाेंदी केल्या जातात.
५. बालकांची उंची व वजनही नियमित घेतले जाते. त्याच्या नाेंदीही याच माेबाइलवरून घेण्यात येतात.
६. सर्व डाटा ऑनलाइन मिळत असल्याने कामात आली गतिमानता.
चाैकट..
१८९०
जिल्ह्यातील अंगणवाड्या
१८९०
अंगणवाडी सेविका
१९५४
माेबाइल वाटप
काेट..
आपण जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना माेबाइल दिले आहेत. त्याद्वारे सध्या कामकाज केले जात आहे. एखाद्या सेविकेचा माेबाइल हँग वा नादुरुस्त झाल्यास काम थांबू नये, म्हणून तालुका स्तरावर ८ ते १० माेबाइल अतिरिक्त देण्यात आले आहेत. त्यामुळे माेबाइल हँग हाेण्याचे प्रकार कमी आहेत.
-बळीराम निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.