अडीचशे शिक्षक दाेन महिन्यांपासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:29 AM2021-01-21T04:29:38+5:302021-01-21T04:29:38+5:30

उस्मानाबाद - काेराेनामुळे शाळा बंद हाेत्या; परंतु या काळात जिल्हा परिषद माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये, यासाठी ऑनलाईन ...

Two and a half hundred teachers have been without pay for months | अडीचशे शिक्षक दाेन महिन्यांपासून वेतनाविना

अडीचशे शिक्षक दाेन महिन्यांपासून वेतनाविना

googlenewsNext

उस्मानाबाद - काेराेनामुळे शाळा बंद हाेत्या; परंतु या काळात जिल्हा परिषद माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये, यासाठी ऑनलाईन धडे देण्यात आले. अशाच सुमारे अडीचशेवर शिक्षकांना जानेवारी महिना सरत आला असतानाही नाेव्हेंबर आणि डिसेंबरचे वेतन मिळालेले नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही शिक्षण विभाग (प्राथमिक) दाद देत नसल्याने संतप्त गुरुजींनी बुधवारी दुपारी थेट सीईओंचे दालन गाठून व्यथा मांडली.

काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर शासनाने सर्वच शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले हाेते; परंतु, विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये यासाठी ऑनलाईन धडे देण्याबाबत फर्मान काढले हाेते. त्यानुसार प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे दिले. हे काम आजही अविरतपणे सुरू आहे. असे असतानाही गुरुजींना वेतन देताना मात्र दिरंगाई हाेत असल्याचा प्रकार समाेर आला आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शाळांवर सुमारे २५७ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना जानेवारी महिना सरत आला असला तरी नाेव्हेंबर तसेच डिसेंबर या महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. माध्यमिक शिक्षक संघटनेकडून शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला; परंतु, कधी बजेट नसल्याचे सांगण्यात आले, तर कधी पाेकळ आश्वासन दिले गेले. विशेष म्हणजे, सरकारकडून ८ जानेवारी राेजी बजेटही उपलब्ध झाले. पैसे येताच प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचे वेतन करण्यात आले. परंतु, माध्यमिक शिक्षकांना अद्याप वेतन मिळालेले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेले गुरुजी बुधवारी थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांचे दालन गाठून व्यथा मांडली. पेमेंट वेळेवर हाेत नसल्याने हाेम लाेन, एज्युकेशन तसेच अन्य कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्त थकत आहेत. परिणामी नाहक वाढीव व्याजाचा भुर्दंड साेसावा लागत आहे. त्यामुळे तातडीने वेतन मिळावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

चाैकट...

दाेन दिवसांत साेडविणार प्रश्न

माध्यमिक शिक्षकांनी सीईओंची भेट घेतल्यानंतर त्यांनी सविस्तर चर्चा केली. विलंब का झाला, याची कारणेही शाेधण्याचा प्रयत्नही केला. चर्चेअंती दाेन दिवसांत वेतनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही दिली. यानंतर शिक्षक दालनातून बाहेर पडले.

काेट...

सातत्याने पाठपुरावा करूनही प्राथमिक शिक्षण विभाग दखल घेत नसल्याने आम्हांला नाइलाजास्तव मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घ्यावी लागली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार दाेन दिवसांत प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी त्यांनी ग्वाही दिली.

- एम. एन. कांबळे, जिल्हाध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ.

Web Title: Two and a half hundred teachers have been without pay for months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.