शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

झाड उन्मळून पडले ; वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

भूम : शहरातील मेन रोडवर भलेमोठे जुने झाड बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या तारांवर कोसळले. यामुळे वीज ...

भूम : शहरातील मेन रोडवर भलेमोठे जुने झाड बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या तारांवर कोसळले. यामुळे वीज वाहिन्या रस्त्यावर पडल्या. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे रस्त्यावर कसलीही वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले. वीजपुरवठा सुरू करण्याचे काम मात्र उशिरापर्यंत सुरूच होते.

शहरातील मुख्य रस्त्यावर गांधी चौकाजवळ उजव्या बाजूला हे जुने मोठे झाड होते. बुधवारी रात्री अचानक हे झाड वीज वाहिन्यावर कोसळले. यामुळे ‘एलटी’ वीज वाहिनी रस्त्यावर पडल्याने या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला. या परिसरात सराफा दुकाने, हॉटेल, किराणा, कपडा आदी व्यापाऱ्यांची दुकाने असून, सातत्याने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे ही घटना दिवसा घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. हे झाड रस्त्यावर आडवे झाल्याने या मार्गची वाहतूक गुरुवारी दिवसभर ठप्प होती. अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रशासनाने हे झाड रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वीजपुरवठा सुरू करण्याचे काम मात्र उशिरापर्यंत सुरूच होते.

चौकट......

मान्सूनपूर्व कामांकडे महावितरणचे दुर्लक्ष

महावितरणने पावसाळ्यापूर्वी विजेच्या तारांमध्ये अडकणाऱ्या फांद्या काढणे, तारा ओढून घेणे यासारखी कामे करून घेणे गरजेचे आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा फांद्यांमुळे झाकून गेल्याचे दिसत आहे. यामुळे थोडा जरी पाऊस, वारे सुटले तरी वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही कामे मार्गी लावावीत,अशी मागणी होत आहे.

070721\20210707_124533.jpg

१) भूम फोटो परंडा रोडवरील फ्लोरा चौकात मेन लाईनवर झाडाचे फाटे वाढलेला फोटो

२) भूम फोटो गांधी चौकाजवळील मेन रोडचे बाभळीचे झाड पडल्याचा फोटो