सोलापूर येथील धूत साडी महोत्सवाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:42+5:302021-09-22T04:36:42+5:30
पुणे-मुंबईच्या ग्राहकांनाही भुरळ घालणारा हा महोत्सव आहे. याठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास बक्षीस असून, महोत्सवाची ६० वर्षांची परंपरा आहे. ग्राहकांसाठी ...

सोलापूर येथील धूत साडी महोत्सवाची परंपरा कायम
पुणे-मुंबईच्या ग्राहकांनाही भुरळ घालणारा हा महोत्सव आहे. याठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास बक्षीस असून, महोत्सवाची ६० वर्षांची परंपरा आहे. ग्राहकांसाठी आव्हानात्मक कमी दरात बक्षिसांसह खरेदी करण्याची ही पर्वणी आहे. राखी पौर्णिमेपासून ते दिवाळीपर्यंतचे सणवार, लग्नसराई आणि महोत्सव यांचा संयोग साधला जातो. सोलापूरची खासियत असलेल्या सिल्कच्या साड्यांचे एक्सक्लुझिव्ह शोरूम केवळ सिल्कच्या साड्या आणि कपड्यांचे तसेच खास वेडिंग कलेक्शनचे स्वतंत्र दुकान आणि शोरूम फक्त सोलापूर शहरातच नाही तर लगतचे कर्नाटकातील जिल्हे आणि मराठवाड्यात एकमेव आहे.
कमीत कमी किमतीतील सिल्कच्या साडीपासून ते लाख रुपये किमतीच्या मौल्यवान साडीपर्यंत अनेक व्हरायटीचे साड्या उपलब्ध आहेत. लग्नाच्या साड्या, घागरा, ओढणी, वर्कच्या मनमोहक काम केलेल्या साड्या, पेहराव, चोली, शेकडो प्रकारचे ड्रेस मटेरियल, राजस्थानी, कर्नाटक, बंगळूर, मैसूर, डिंडिगल, धर्मावरम, मदुराई, बनारस, कोलकत्ता, अशा अनेक ठिकाणच्या कलाकार विणकरांनी विणलेल्या सिल्क साड्या थेट मार्गावरून दुकानात आहे. सोलापूर शहरातील चाटे गल्ली, बाळीवेस भागातील धूत सारीज मध्ये हा महोत्सव सुरू आहे. (वाणिज्य वार्ता)