तामलवाडी ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:54+5:302021-02-10T04:32:54+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तामलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या मंगल बंडू गवळी तर उपसरपंचपदी हमीद महेबूब ...

तामलवाडी ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तामलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या मंगल बंडू गवळी तर उपसरपंचपदी हमीद महेबूब पठाण यांची मतदानाद्वारे मंगळवारी निवड झाली. या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.
निवडणूक अधिकारी अभंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीस प्रारंभ झाला. महाविकास आघाडीकडून सरपंचपदासाठी मंगल गवळी, भाजपकडून अनिता पाटील तर उपसरपंचपदासाठी हमीद पठाण व शीतल गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते. मतदान प्रक्रियेतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ८ तर भाजपच्या उमेदवाराला ३ मते मिळाली. यामुळे सरपंचपदी मंगल गवळी तर उपसरपंचपदी हमीद पठाण यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले. बैठकीस सुधीर पाटील, सतीश माळी, आप्पासाहेब रणसुरे, नुरबानू बेगडे, सुरेखा माळी, संजना गुरव, अनिता पाटील, यशवंत लोंढे, शीतल गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते. निकाल जाहीर होताच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुलाल उधळून फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, माजी पं. स. सदस्य गुंडाप्पा गायकवाड, मारुती पाटील, भास्कर पाटील, आप्पूराजे गवळी, हणमंत गवळी, आलिम शेख, बंडू गवळी, अमोल घोटकर, माजी सैनिक शिवाजी सावंत, नागनाथ गवळी, शाहीर गायकवाड, निरंजन करंडे, महेश जगताप, ज्ञानेश्वर जगताप, धम्मपाल रणसुरे, मुकुंद गायकवाड, संभाजी माळी, समाधान गायकवाड, बाळू गायकवाड, राहुल वाघमारे आदी उपस्थित होते.
चौकट..
हमीद पठाण यांना दुसऱ्यांदा संधी
काॅँग्रेसचे हमीद पठाण यांनी यापूर्वी उपसरपंचपदाची धुरा पाच वर्षे सांभाळली होती. यंदा महाविकास आघाडीकडून हमीद पठाण यांना पुन्हा दुसऱ्यांदा उपसरपंचपदाची संधी देण्यात आली आहे. दरम्यान, संजना गुरव, सुरेखा माळी या सदस्यांना मतदारांनी दुसऱ्यांदा निवडून देऊन काम करण्याची संधी दिली आहे.