सुट्टीचा लाभ घेतला, मात्र ध्वजारोहण केले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:59+5:302021-09-18T04:35:59+5:30
कळंब : हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त अगदी जिल्हा बँकेच्या शाखेतही ध्वजारोहण केले जात असताना कळंब शहरातील पोस्टासह विविध बँकाोना ...

सुट्टीचा लाभ घेतला, मात्र ध्वजारोहण केले नाही
कळंब : हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त अगदी जिल्हा बँकेच्या शाखेतही ध्वजारोहण केले जात असताना कळंब शहरातील पोस्टासह विविध बँकाोना याचा विसर पडला आहे. यामुळे यासंबंधी सुटीचा उपभोग घेत ध्वजारोहण न करणाऱ्या व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे.
देश परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त होत स्वतंत्र झाला तरी मराठवाडा हा हैदराबादच्या निजाम राजवटीतच अडकला होता. यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपला प्राण पणाला लावला. लढा उभारून हैदराबाद संस्थानची मुक्ती मिळवली. याच अनुषंगाने १७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. शासकीय सुटी दिली जाते. शासकीय, निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण केले जाते. शुक्रवारी यासंदर्भात विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले असताना कळंब शहरातील महाराष्ट्र ग्रामीण, बँक ऑफ महाराष्ट्र, एसीबीआय, पोस्ट खाते आदी विविध वित्तीय संस्थात ध्वजारोहण करण्यात आले नाही. विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखेत असे ध्वजारोहण केले जात असताना या वित्तीय आस्थापनांना विसर पडला.
चौकट...
तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयालाही विसर...
महसूल विभागाचे गाव पातळीवर तलाठी यांचे सज्जा कार्यालय आहे. शिवाय मंडळस्तरावर मंडळ अधिकारी कार्यालय. या दोन्ही कार्यालयांना स्वतंत्र कार्यालयाचा दर्जा आहे. असे असतानाही या कार्यालयात ध्वजारोहण होत नसल्याचा पुन्हा अनुभव आला.