जिल्ह्याचा लाैकिक वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आज सन्मान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST2021-08-15T04:33:51+5:302021-08-15T04:33:51+5:30
उस्मानाबाद : नगरपरिषदेच्या वतीने जिल्ह्याचा नावलाैकिक वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वास ‘उस्मानाबाद भूषण’ व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कार्यगाैरव पुरस्काराने १५ ऑगस्ट ...

जिल्ह्याचा लाैकिक वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आज सन्मान सोहळा
उस्मानाबाद : नगरपरिषदेच्या वतीने जिल्ह्याचा नावलाैकिक वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वास ‘उस्मानाबाद भूषण’ व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कार्यगाैरव पुरस्काराने १५ ऑगस्ट राेजी सकाळी १० पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. ही माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.
उस्मानाबाद नगरपरिषदेची स्थापना २५ मे, १९५८ राेजी झाली आहे. प्रत्येक वर्षी २५ मे हा नगरपरिषद स्थापना दिवस म्हणून साजरा केला जाताे. या स्थापना दिनाचे औचित्य साधून उपराेक्त पुरस्कार जाहीर करण्यात आले हाेते, परंतु काेराेना महामारीमुळे पुरस्कार वितरण साेहळा घेता आला नाही. दरम्यान, सध्या काेराेनाचा संसर्ग काही अंशी ओसरला आहे. शासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. त्यामुळे १५ ऑगस्ट राेजी सकाळी १० वाजता पालिकेच्या प्रांगणात हा पुरस्कार वितरण साेहळा घेण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तर आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद शूरसेन राजेनिंबाळकर व उपाध्यक्ष अभय इंगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उस्मानाबाद भूषण पुरस्काराने माजी न्यायमूर्ती पुरुषाेत्तम गायकवाड यांना देण्यात येणार आहे. गायकवाड हे ताेरंबा गावचे रहिवासी आहेत.
यासाेबतच कार्यगाैरव पुरस्काराने क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खाे-खाे संघाच्या कॅप्टन सारिका काळे, खाे-खाे प्रशिक्षक चंद्रजीत जाधव, क्रिकेट प्रशिक्षक राम हिरापुरे यांना सन्मानित केले जाणार आहे. आराेग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डाॅ.इस्माईल मुल्ला, डाॅ.सचिन देशमुख, डाॅ.प्रवीण डुमणे, डाॅ.विशाल वडगावकर, डाॅ.सुश्रुत डंबळ, डाॅ.शकील अहमद खान, डाॅ.अनुराधा लाेखंडे यांना गाैरविले जाणार आहे. सामाजिक क्षेत्रातून संजय निंबाळकर, शैक्षणिक क्षेत्रातून सुधीर पाटील, लहू लाेमटे, सुरेश गायकवाड, कला क्षेत्रातील दीपाली नायगावकर, नगरपरिषदेतील पृथ्वीराज पवार, संजय कुलकर्णी, सुनील कांबळे, विलास गाेरे, शासकीय रुग्णालयातील जावदकर सुमन बासू, वाहिदा शेख, उषा दाणे, संध्या निकम, सुरेखा जाधव, नीलेश पाचभाई, तर साहित्य क्षेत्रातून युवराज नळे यांना सन्मानित केले जाणार आहे. या सन्मान साेहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.