शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्यासाठी सांगलीहून आले धाराशिवमध्ये, पोलिसांच्या गस्ती दरम्यान तिघे जाळ्यात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:52 IST

धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाने घेतले ताब्यात

धाराशिव : सांगली जिल्ह्यातील ती दरोडेखोर त्यांच्या दोन अन्य सथीदारांसह धाराशिव जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीने आले होते. मात्र, गुन्हे शाखेच्या पोलिसांची सोमवारी गस्त सुरू असताना त्यांच्या निदर्शनास आले अन् तिघे गजाआड झाले. त्यांच्याकडून पोलिसांनी दरोड्यासाठी वापरात येणारे साहित्यही जप्त केले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सोमवारी पहाटे रात्र गस्तीवर धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरात होते. तेथील तेरणा कारखान्याच्या परिसरातील तेरणा शाळेच्या फलकाजवळ हे पथक आले असता तेथे पाच जण अंधारात संशयितरीत्या थांबल्याचे निदर्शनास आले. पथकातील सहायक निरीक्षक सुदर्शन कासार यांच्यासह कर्मचारी शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, रत्नदीप डोंगरे, नितीन भोसले यांनी या संशयितांची विचारपूस करण्यासाठी वाहन थांबवून त्यांच्या दिशेने जात असताना दोघांनी दुचाकी सुरू करून तेथून धूम ठोकली. पाठोपाठ संतोष प्रभाकर कुराडे, अविनाश प्रभाकर कुराडे (रा. अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) व प्रवीण राजाराम मोरे (रा. चांदोल वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) हे तिघेही दुचाकीवरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकून पकडले. या तिघांचीही झडती घेतली असता त्यांच्याकडे कत्ती, कटावणी, कटर असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. सोबतच पोलिसांनी त्यांच्याकडील तीन मोबाइल व एक दुचाकी, असा ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध सपोनि. कासार यांच्या फिर्यादीवयन ढोकी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी त्यांना ढोकी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

धाराशिवचे कनेक्शन काय ?पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी यापूर्वीही धाराशिव तसेच सांगली जिल्ह्यात दरोडे, जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर दोन्ही जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या आरोपींकडून जप्त करण्यात आलेली दुचाकी ही धाराशिव पासिंगची आहे. ही दुचाकी नेमकी कोणाची, त्यांचे साथीदार स्थानिक आहेत काय, याचा तपास करतानाच धूम ठोकलेल्या आरोपींना पकडण्याचे आव्हानही पोलिसांपुढे असणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर