आठवडी बाजारातून तीन मोबाईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:24 IST2021-01-13T05:24:37+5:302021-01-13T05:24:37+5:30
तुळजापुरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण उस्मानाबाद : तुळजापूर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचे ७ जानेवारी रोजी अपहरण झाले. याप्रकरणी ...

आठवडी बाजारातून तीन मोबाईल लंपास
तुळजापुरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण
उस्मानाबाद : तुळजापूर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचे ७ जानेवारी रोजी अपहरण झाले. याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
तुळजापूर येथील आदित्य योगेश गंभीरे हा १६ वर्षीय मुलगा ७ जानेवारी रोजी आपल्या घरातून बाहेर गेला. त्यानंतर तो पुन्हा घरी परतलाच नाही. यावरुन आदित्यची आई अनिता गंभीरे यांनी तुळजापूर ठाण्यात अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपरहण केल्याची फिर्याद दिली. यावरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंद झाला.
५१६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्यावतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारी जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५१६ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून १ लाख १२ हजार ८०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
जुन्या भांडणावरून एकास मारहाण
उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघास दोन व्यक्तींनी घरात घुसून मारहाण केली. ही घटना कळंब तालुक्यातील दाभा येथे १० जानेवारी रोजी घडली. दाभा येथील विष्णुकांत पंडित टेळे हे आपल्या आजोबांसह घरी थांबले होते. यावेळी गावातीलच ज्ञानेश्वर व विठ्ठल अंबादास कदम या दोघा भावांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून टेळे यांच्या घरात घुसून मारहाण केली. टेळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त दोघांविरुध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रस्त्यात वाहन केले उभे; चालकावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : रस्त्यात वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस पथकाच्यावतीने कारवाया केल्या जात आहेत. १० जानेवारी रोजी मुरुम पोलीस ठाण्याच्या पथकास मुरुम येथील मुख्य रस्त्यावर कर्नाटक येथील परमेश्वर बिराजदार यांनी आपली जीप आढळून आली. यावरुन मुरुम ठाण्यात चालकाविरुध्द गुन्हा नोंद झाला.
दारू अड्ड्यावर छापा; एकाविरुध्द गुन्हा
उस्मानाबाद : उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने १० जानेवारी रोजी घाटंग्री येथील दारू अड्ड्यावर छापा टाकला. यात घाटंग्री येथील विवेक हराळे यांच्याजवळ शेतात १५ लिटर अवैध गावठी दारू आढळून आली. पोलिसांनी मद्य जप्त करून संबंधितांविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.