सहा महिन्यात एकाच ठिकाणी तीन वेळा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:07+5:302021-07-04T04:22:07+5:30
तुळजापूर : सहा महिन्यात एकाच ठिकाणी तीन वेळा चोरी करून चोरट्यांनी जवळपास चार लाख रुपये किमतीची जनावरे चोरून नेली. ...

सहा महिन्यात एकाच ठिकाणी तीन वेळा चोरी
तुळजापूर : सहा महिन्यात एकाच ठिकाणी तीन वेळा चोरी करून चोरट्यांनी जवळपास चार लाख रुपये किमतीची जनावरे चोरून नेली. असे असताना पोलिसांना मात्र अद्याप एकाही चोरीचा तपास लागला नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील नीलेगाव येथील शेतकरी भीमाशंकर विठ्ठल जमादार हे शेतीसह पशुधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. २५ डिसेंबर २०२० रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या २५ शेळ्या चोरून नेल्या. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करून दोन महिन्यांचा कालावधी उलटतो न उलटतो तोच १३ जानेवारी २०२१ रोजी याच ठिकाणाहून ५० हजार रुपये किमतीचा बैल चोरीस गेला. या दोन्ही घटनांचा तपास अजून लागलेला नसताना २९ जून रोजी याच ठिकाणाहून खिलार जातीचे दोन खोंड व एक गाय चोरट्यांनी चोरून नेली.
सहा महिन्यात एकाच ठिकाणाहून तीन वेळा चोरी होऊन चार लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, नळदुर्ग पोलिसांना यातील एकाही चोरीचा अद्याप तपास लागला नाही. यामुळे जमादार यांनी आता पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन घटनेचा तत्काळ तपास लावण्याची मागणी केली आहे.