चार दुचाकींसह चोरटा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST2021-09-11T04:33:25+5:302021-09-11T04:33:25+5:30

कळंब : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरूवारी पाथर्डी येथील एकास चोरीच्या चार दुचाकींसह ताब्यात घेतले. कळंब पोलीस ठाण्याचा चार्ज ...

Thieves arrested with four bikes | चार दुचाकींसह चोरटा जेरबंद

चार दुचाकींसह चोरटा जेरबंद

कळंब : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरूवारी पाथर्डी येथील एकास चोरीच्या चार दुचाकींसह ताब्यात घेतले. कळंब पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर पोनि. यशवंत जाधव यांनी लागलीच या दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कळंब शहर व ग्रामीण भागात अलीकडे दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळेच ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले पोनि. यशवंत जाधव यांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पोनि. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. सुनील कोळेकर, पोना. दळवी, पोना. पठाण, पोकॉ. मीनाज शेख, अजिज शेख, अमोल जाधव, एएसआय पठाण यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी रात्री अचानक पाथर्डी येथे छापा टाकला. यावेळी अनिल लाला पवार (रा. पाथर्डी) या २५ वर्षीय तरुणास १ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण चार दुचाकींसह ताब्यात घेण्यात आले.

इंधन संपले म्हणून दिली सोडून...

कळंब पोलिसांनी दुचाकीचोरीचा छडा लावला आहे. यात कळंब, शिराढोण व अंबाजोगाई हद्दीत नोंद असलेल्या चार प्रकरणातील दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यापैकी एक दुचाकी तर पवार याने चोरी करताना इंधन संपले म्हणून शहरातील एका हॉस्पिटलमागे सोडून पोबारा केला होता. ही दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली आहे.

Web Title: Thieves arrested with four bikes