रुग्णालयात जागा नाही, कोविड केअर सेंटर मात्र रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:34 IST2021-04-20T04:34:06+5:302021-04-20T04:34:06+5:30
सेंटरमधील कोविडग्रस्तांवर उपचार करणारी रुग्णालये २४ सामान्य बेड एकूण बेड ३७९ रिकामे बेड ८६ ऑक्सिजन बेड ६९१ रिकामे ऑक्सिजन ...

रुग्णालयात जागा नाही, कोविड केअर सेंटर मात्र रिकामे
सेंटरमधील कोविडग्रस्तांवर उपचार करणारी रुग्णालये
२४
सामान्य बेड
एकूण बेड ३७९
रिकामे बेड ८६
ऑक्सिजन बेड ६९१
रिकामे ऑक्सिजन बेड ५४
काेविड सेंटर २९
एकूण बेड २९४१
रिकामे बेड २०७८
रुग्णांची बेड मिळविण्यासाठी वणवण
कोरोना संसर्ग वाढत असल्याने रुग्णालयातील बेडही अपुरे पडत आहेत. रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतरच बेड रिकामे होत आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बेड मिळण्यासाठी फिरावे लागत आहे.
चौकटी...
कोविड सेंटर्समध्ये ६० टक्के बेड रिकामे
९० पेक्षा कमी ऑक्सिजन असलेल्या रुग्णांना उपचारांवर डेडिकेटेड कोविड रुग्णालयात व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील २९ कोविड सेंटरमध्ये एकूण २९४१ इतक्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी केवळ १ हजार ५ रुग्ण असून, उर्वरित २ हजार ७८ बेड रिकामे आहेत.
रुग्णांना सौम्य लक्षणे तरीही रुग्णालयात
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सौम्य लक्षणे असतानाही गृहविलगीकरणात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये न राहता रुग्णालयात उपचारास जाण्याचा अट्टहास करीत आहेत. त्यामुळे इतर गंभीर रुग्णांना बेड मिळणेही कठीण होत आहे.
कोट...
जिल्ह्यात क्रिटिकल रुग्णांवर उपचारासाठी डेडिकेटेड कोविड रुग्णालयात व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित केले आहेत, तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतल्यास क्रिटिकल रुग्णांना बेड मिळण्यासाठी धावपळ होणार नाही.
डॉ. सचिन बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी.