"पंतप्रधानांनी आजवर देशाला 'एप्रिल फुल' केलं"; राष्ट्रवादी युवकने केक कापून केला निषेध

By सूरज पाचपिंडे  | Updated: April 1, 2023 17:17 IST2023-04-01T17:17:22+5:302023-04-01T17:17:44+5:30

'केंद्र सरकारला घोषणांचा विसर'; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धाराशिवमध्ये अनाेखे आंदाेलन

"The Prime Minister made the country 'April Fool'"; Nationalist youth congress cut the cake and did a unique agitation | "पंतप्रधानांनी आजवर देशाला 'एप्रिल फुल' केलं"; राष्ट्रवादी युवकने केक कापून केला निषेध

"पंतप्रधानांनी आजवर देशाला 'एप्रिल फुल' केलं"; राष्ट्रवादी युवकने केक कापून केला निषेध

धाराशिव : केंद्र सरकारने केेलेल्या घोषणांची पूर्तता न करता, महागाई वाढविल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरसमोर केक कापून अनोखे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘एप्रिल फुल’च्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

केंद्र सरकार सत्तेत येण्यापूर्वी काळा पैसा भारतात आणू, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करू, देशातील तरुणांना रोजगार देऊ, महागाई कमी करू अशी माेठमाेठी आश्वासने दिली हाेती. मात्र, नऊ वर्षांचा कालावधी लाेटला असतानाही ना महागाई कमी झाली ना प्रत्येकाच्या खात्यामध्ये १५ लाख जमा झाले. पंतप्रधानांनी आजवर देशातील जनतेला ‘एप्रिल फुल’ करण्याचेच काम केले आहे, असा आराेप करीत शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर अनाेखे आंदाेलन केले. 

पंतप्रधान माेदी यांचे छायाचित्र असलेल्या पाेस्टरसमाेर थेट केक कापला. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसेचे प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते, सौरभ देशमुख, प्रवीण लाडुळकर,अजयकुमार कोळी, शरद जगदाळे, ज्ञानेश्वर निंबाळकर, अनिकेत पाटील, वैभव मोरे, विजय घोगरे, महेश सुरवसे आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: "The Prime Minister made the country 'April Fool'"; Nationalist youth congress cut the cake and did a unique agitation