शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानीस श्रीकृष्णने भेट दिलेल्या मुरलीचा अलंकार, हजारो भाविकांनी घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:28 IST

नवरात्रीची सहावी माळ; मुरली अलंकार महापूजेचे हजारो भाविकांनी घेतले विहंगम दर्शन

- गोविंद खुरूदतुळजापूर (धाराशिव): शारदीय नवरात्र उत्सवातील सहावी माळ (शनिवार) या निमित्ताने आज तुळजाभवानी मातेची अत्यंत मनमोहक 'मुरली अलंकार विशेष महापूजा' मांडण्यात आली होती. रात्री दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यानंतर हजारो देवीभक्तांनी भक्तीभावाने या विशेष रूपाचे दर्शन घेतले.

सकाळी नित्य उपचार अभिषेक पूजा आणि सिंहासन पूजा पार पडल्यानंतर भोपे पुजारी बांधवांनी तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा बांधली. या पूजेत तुळजाभवानीला राखाडी रंगाचे महावस्त्र नेसवून, त्यावर विविध हिरे, मोती आणि सोन्याचे अलंकार घालण्यात आले होते. या अलंकाराचे मुख्य आकर्षण म्हणजे देवीच्या दोन्ही हातांमध्ये बासरी (मुरली) ठेवण्यात आली होती, ज्यात तुळजाभवानी बासरी वाजवत आहे, असे मनमोहक रूप साकारले गेले. या बासरीच्या सुराने पृथ्वीतलावरील देवीभक्त तल्लीन होतात, अशी भावना या पूजेतून व्यक्त होते.

मुरली अलंकाराचे वैशिष्ट्य, श्रीकृष्णाने दिली होती मुरलीया महापुजेला मोठे धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक आख्यायिकेनुसार, भगवान श्रीकृष्ण यांनी तुळजाभवानी मातेस आपली मुरली (बासरी) भेट दिली होती. त्याच प्रसंगाची आठवण म्हणून शारदीय नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार पूजा मांडली जाते.

वाघ वाहनावर छबिनादरम्यान, शुक्रवारी सायंकाळची अभिषेक पूजा संपताच तुळजाभवानीचा वाघ या वाहनावर छबिना काढण्यात आला होता. विधिवत पूजा आणि श्रीफळ वाढवल्यानंतर या वाहनाने मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी उपस्थित देवीभक्तांनी पोत ओवाळून तुळजाभवानीच्या गजरात देवीचे दर्शन घेतले, ज्यामुळे मंदिर परिसरात भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Tulja Bhavani adorned with Krishna's flute; devotees throng for darshan.

Web Summary : Tulja Bhavani's Murli Alankar Mahapuja, marking the sixth day of Navratri, drew thousands. The deity was adorned with Krishna's flute, a symbolic gift, creating a captivating spectacle. A procession on a tiger further enhanced the festive atmosphere.
टॅग्स :dharashivधाराशिवspiritualअध्यात्मिक