शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

उस्मानाबादकरांसाठी खुशखबर; दमदार पावसाने जिल्ह्याचा भूजल स्तर १.६९ मीटरने वाढला

By सूरज पाचपिंडे  | Updated: October 15, 2022 17:33 IST

मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याची भूजल स्तर सरासरी १.६९ मीटरने वाढला आहे.

- सूरज पाचपिंडेउस्मानाबाद  : मागील तीन चार वर्षापासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. या वर्षीही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. परिणामी, जिल्ह्याची भूजल पातळी १.६९ मीटरने वाढली आहे. 

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यात पाऊस कमी प्रमाणात झाला. जुलै महिन्यात सर्वच भागात पाऊस पडत होता. ऑगस्ट महिन्यात अधूनमधून पाऊस पडत राहिला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. ऑक्टोबर महिन्यातही परतीचा पाऊस पडत आहे. काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, ओढे, नालेही प्रवाहित झाले होते. शिवाय, भूजलाचे पुनर्भरण झाले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात भूजल पातळीही वाढ झाली आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याची भूजल स्तर सरासरी १.६९ मीटरने वाढला आहे. जिल्ह्यात ऊस पिकांसह बागायती व फळ पिकांकरिता काही तालुक्यांमध्ये पाण्याचा अमर्याद उपसा होत असतो. मात्र, तीन वर्षापासून काही तालुक्यांमध्ये झालेला समाधानकारक पाऊस भूजल पातळी वाढीसाठी पाेषक ठरला आहे.

११४ निरीक्षण विहिरींची तपासली पातळीभूजल सर्वेक्षण विभागाद्वारे दर तीन महिन्यांनी सर्व तालुक्यातील ११४ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेतली जाते. यंदा झालेले पर्जन्यमान व मागील पाच वर्षांच्या पाणी पातळीचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. ऑक्टोबर महिन्यात भूजल  स्तर २.१८ मीटरने वर आल्याचे समोर आले. 

तालुकानिहाय भूजल पातळीत झालेली वाढतालुका      भूजल पातळीत वाढभूम           २.५७कळंब       ०.५९लोहारा      १.८१उमरगा      २.०२उस्मानाबाद  १.६६परंडा        २.५०तुळजापूर    १.२३वाशी         १.२१

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादRainपाऊसWaterपाणी