शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत परंड्याचा पेच संपता संपेना; तुळजापुरात माजी मंत्री ८७ वर्षीय मधुकरराव चव्हाण अपक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 13:24 IST

राज्यातील मोजक्याच जागांवरून आघाडीत धुसफूस सुरू आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील परंड्याच्या जागेचाही समावेश आहे.

धाराशिव : अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील परंडा व तुळजापूर मतदारसंघातील घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंड्यात आघाडीतील दोन मित्रपक्षांनी उमेदवार दिले आहेत. अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशीही हा पेच सुटला नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर माजी राज्यमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करीत दंड थोपटले आहेत.

राज्यातील मोजक्याच जागांवरून आघाडीत धुसफूस सुरू आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील परंड्याच्या जागेचाही समावेश आहे. येथून उद्धवसेनेने दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करताच दुसऱ्याच दिवशी माजी आमदार राहुल मोटे यांनी शरद पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी दाखल केली. यावरून दोन्ही मित्रपक्षांत खटके उडाले आहेत. राहुल मोटे यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरला तर रणजित पाटील यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमच्या सभेत या जागेवरील पेच ४ तारखेच्या आत सोडवू, असे सांगितले आहे. तर उद्धवसेनेकडून खा. ओम राजेनिंबाळकर यांनीही याच विधानाचा पुनरुच्चार केला. त्यामुळे ही जागा कोणाकडे राहणार, याविषयीचा सस्पेन्स अजून संपला नाही.

८७ वर्षांचे मधुकरराव आग्रही...वयाच्या नव्वदीकडे मार्गक्रमण करीत असलेले माजी राज्यमंत्री मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली आहे. यामुळे मंगळवारी त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष म्हणून अर्ज केला. पक्षाने सांगितले तरी आता माघार नाही, असे विधान करीत बंडाचे स्पष्ट संकेत देऊ केले आहेत. त्यामुळे येथील लढतीत मोठाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकtuljapur-acतुळजापूरparanda-acपरांडाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी