तेरखेड्यात चोरट्यांचा उच्छाद, चार घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST2021-03-09T04:35:27+5:302021-03-09T04:35:27+5:30
तेरखेडा गावाच्या मध्यवर्ती भागात बिरज जाजू यांचे किराणा दुकान आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ...

तेरखेड्यात चोरट्यांचा उच्छाद, चार घरे फोडली
तेरखेडा गावाच्या मध्यवर्ती भागात बिरज जाजू यांचे किराणा दुकान आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील १७ हजार रुपये चोरून नेले, तसेच ग्रामपंचायत सदस्या शिवकन्या संजय भुजबळ या कुटुंबासमवेत बाहेरगावी गेल्या होत्या. त्यांच्याही घराचे कुलूप तोडून कपाटातील सासूबाईचे ६ हजार रुपये, चांदीचे दागिने चोरून नेले, तर चंद्रकांत वाळके यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. मात्र, शेजारी जागे झाल्याने त्यांनी पळ काढला. मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेले सुधीर खराडे यांच्या तेरखेडा येथील घराचे कुलूप तोडून आतील सामानाची नासधूस केली. दरम्यान, बिरज जाजू यांनी चोरीप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.