तेली समाजाकडून गरजूंना देणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:30+5:302021-07-03T04:21:30+5:30
उस्मानाबाद : कोरोना आजाराने समाजातील अनेक कुटुंबांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे अशा गरजू आधार देण्यासाठी पुढील आठवड्यात मंगळवारी जिल्हा ...

तेली समाजाकडून गरजूंना देणार मदत
उस्मानाबाद : कोरोना आजाराने समाजातील अनेक कुटुंबांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे अशा गरजू आधार देण्यासाठी पुढील आठवड्यात मंगळवारी जिल्हा दौरा करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अखिल भारतीय तैलिक शाहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शानाखाली प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी लक्ष्मण निर्मळे तर जिल्हा युवक अध्यक्षपदी शशिकांत बेगमपुरे, ज्येष्ठ नागरिक विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून चंद्रकांत मेंगले, शहराध्यक्ष शिवलिंग होनखांबे, युवक जिल्हा सचिव संतोष क्षीरसागर, सहसचिव नागेश निर्मळे, शहराध्यक्ष जितेंद्र घोडके, शहर सचिव गणेश घोडके यांच्या निवडीबद्दल जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, तालुकाध्यक्ष दत्तात्रय बेगमपुरे, संचालक रमेश साखरे, प्राचार्य डॉ.अनिल देशमाने, प्रा.चंद्रशेखर राऊत, परमेश्वर राऊत आदींची उपस्थिती होती.