शिक्षक सोसायटी देणार १० टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST2021-09-27T04:36:01+5:302021-09-27T04:36:01+5:30
लोहारा : तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेची १७वी वर्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ऑनलाइन घेण्यात आली आहे. यावेळी चेअरमन ...

शिक्षक सोसायटी देणार १० टक्के लाभांश
लोहारा : तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेची १७वी वर्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ऑनलाइन घेण्यात आली आहे. यावेळी चेअरमन राम मुसांडे यांनी सभासदांना १० टक्के लाभांश तसेच सभासदाच्या मृत्यूनंतर वारसांना दहा लाख रुपये देण्याचा निर्णय संस्थेने घेतला असल्याचे सांगितलेे.
या पतसंस्थेचे एकूण भाग भांडवल साडेचार कोटींहून अधिक असून, पतसंस्थेला पन्नास लाख रुपयांचा नफा झाला आहे. दीर्घ मुदतीचे कर्ज आता सात लाख रुपयांवरून दहा लाख रुपये केले आहे. सभासदांच्या मृत्यूनंतर वारसास दहा लाख, तर डी.सी.पी.एस, एन.पी.एस. सभासदांच्या वारसांना जास्तीचे अडीच लाख देण्याचा निर्णय घेतल्याचेही मुसांडे म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनीही मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव यांनी पतसंस्थेची प्रगती मांडली. प्रास्ताविक संचालक विकास घोडके यांनी केले. सभासदांच्या प्रश्नांना सचिव विश्वजित चंदनशिवे यांनी उत्तरे दिली. अहवाल वाचन व आभार व्हा. चेअरमन सूर्यकांत पांढरे यांनी केले. सभेला जिल्हा सोसायटीचे चेअरमन एल. बी. पडवळ व सभासद ऑनलाइन हजर होते. सभेसाठी संचालक मल्लीकार्जुन कलशेट्टी, दत्तात्रय फावडे, लिपिक रवींद्र कोकणे, सेवक किरण दासिमे यांचे सहकार्य केले. (वाणिज्य वार्ता)