शिक्षकांनो, लसीकरण करून घ्या, पाच सप्टेंबरची डेडलाइन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST2021-09-03T04:34:13+5:302021-09-03T04:34:13+5:30

शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. काही अपवाद वगळता, ग्रामीण भागातील बहुतांश ...

Teachers, get vaccinated, September 5 deadline! | शिक्षकांनो, लसीकरण करून घ्या, पाच सप्टेंबरची डेडलाइन !

शिक्षकांनो, लसीकरण करून घ्या, पाच सप्टेंबरची डेडलाइन !

शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. काही अपवाद वगळता, ग्रामीण भागातील बहुतांश शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना, शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे. परंतु, अद्यापही शेकडो शिक्षकांनी कोरोना लसीकरण करून घेतलेले नाही. याबाबतीत काहींनी वेळकाढू धोरण स्वीकारल्यामुळे लस घेतलेली नाही. परंतु, आता राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस घेण्याची सक्ती करीत, ५ सप्टेंबरची डेडलाईन दिली आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण

शाळा पहिला डोस दुसरा डोस, दोन्ही डोस न घेतलेले

- शासकीय शाळांतील ११२ ६२५ १७

शिक्षक-

-शासकीय शाळांतील ३ १४ १

शिक्षकेतर कर्मचारी-

- खासगी शाळांतील ११९ ९३२ ८६

शिक्षक-

- खासगी शाळेतील ९ २१ ४

शिक्षकेतर कर्मचारी

म्हणून नाही घेतली लस

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचे कोरोनाचे लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. मात्र मला पोटाचा त्रास असल्याने शस्त्रक्रिया करायची आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन लस घेणार आहे.

- मीनाक्षी चंडकापुरे, शिक्षिका, जि. प. प्रशाला, मुळज.

मी लस घेण्याची तयारी केली हाेती; परंतु, डाॅक्टरांनी आताच लस घेऊ नका, असा सल्ला दिला आहे. ४५ दिवसांनी लस घेण्यास हरकत नाही, असे त्यांनी आता सांगितले आहे. त्यावेळी लस घेणार आहे.

- कोमल जाधव, शिक्षिका, जि. प. प्रशाला, मुळज.

कोविड लसीकरण मोहीम तालुका समन्वयक

कोरोना लसीकरणाची नियमित सत्रे सुरू आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राधान्य आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही, अशांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी.

- डॉ. विक्रम आळंगेकर, तालुका समन्वयक, उमरगा.

Web Title: Teachers, get vaccinated, September 5 deadline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.